उतारवयात दीर्घकाळ निष्क्रिय राहिल्याने मनगटात सूज येते

    27-Aug-2026
Total Views |
 
hand
जास्त शारीरिक श्नतीचे काम केल्यास हातांच्या पेशी व शिरा जखमी हाेण्याची शक्यता असते. या जखमांमुळै पेशींमध्ये फ्लूइड भरू शकते. कधी कधी दीर्घकाळ शारीरिक रूपाने निष्क्रिय राहिल्यामुळे ्नत हातच नव्हे तर शरीराच्या इतर भागां- मध्येही सूज निर्माण हाेऊ शकते.
 
उतारवयासाेबत हातांची काम करण्याची क्षमता कमी हाेऊ लागते.
शरीराची संचारप्रणाली, बाॅडी टिश्यू वा कॅव्हिटीजमध्ये जास्त फ्लूइड साचल्यामुळे हाताला सूज येऊ शकते. हाताच्या सूजेचे दुसरे कारण एडिमा असू शकते.
 
चाळिशीनंतर टिश्यू व शिरा कमकुवत हाेऊ लागतात. या वयानंतर जास्त शारीरिक श्नतीचे काम केल्यास हातांच्या पेशी व शिरा जखमी हाेण्याची शक्यता असते. या जखमांमुळै पेशींमध्ये फ्लूइड भरू शकते.
 
कधी कधी दीर्घकाळ शारीरिक रूपाने निष्क्रिय राहिल्यामुळे ्नत हातच नव्हे तर शरीराच्या इतर भागांमध्येही सूज निर्माण हाेऊ शकते. हातात सुजेमुळे वेदना, खाज, हात वा दंड बधिर हाेण्यासारख्या समस्या हाेऊ शकतात. लक्षणे पाहून डाॅक्टरांकडून तपासून घ्यावे.
 
ही दक्षता घ्या डाॅक्टरांचा सल्ला घेऊन खाण्यात मिठाचा वापर कमी करावा. कारण साेडियमच्या जास्त प्रमाणामुळे शरीरात पाणी थांबण्याची समस्या हाेऊ शकते.
 
पाेटॅशियमच्या जास्त वापरामुळे शरीरात साेडियमचा स्तर संतुलित राखण्यास मदत मिळते. केळी व टाेमॅटाेत पाेटॅशियमचे प्रमाण जास्त आढळते.