अलिबाग, 25 ऑगस्ट (आ.प्र.) :
पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या आणि दरडी काेसळण्यामुळे महिनाभर बंद ठेवाव्या लागलेल्या ताम्हिणी घाटात लवकरच दहा किमीच्या बाेगद्याची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू असून, महामार्ग विभागामार्फत निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
जुलैत झालेल्या अतिवृष्टीचा माेठा फटका रायगड जिल्ह्यातील घाट मार्गांना बसला. अनेक रस्ते भूस्खलनाच्या घटनांमुळे बाधित झाले. यात पुणे आणि रायगड जिल्ह्याला जाेडणाऱ्या ताम्हिणी घाटातील राष्ट्रीय महामार्गाचा समावेश हाेता. जवळपास महिनाभर या मार्गावरील वाहतूक ठप्प हाेती. त्याचा फटका रायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायालाही बसला. ही बाब लक्षात घेऊन आता ताम्हिणी घाटातील धाेकादायक मार्गाऐवजी दहा किमीचा बाेगदा करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.
त्यामुळे ताम्हिणी घाटातील दरडींचा धाेका कमी हाेईल.
यासाठी महामार्ग विभागामार्फत निधी देण्याची तयारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याची माहिती तटकरे यांनी दिली.
महारेल अंतर्गत कर्जतमध्ये तीन, तर नागाेठण्यात एका रेल्वे उड्डाणपुलांची उभारणी केली जाणार असून, त्यासाठी जवळपास साडेचारशे काेटींचा निधी उपलब्ध हाेणार आहे.
ही कामे लवकरच सुरू हाेतील, असा विश्वास तटकरे यांनी व्य्नत केला. मुंबई- गाेवा महामार्गावरील सुकेळी खिंड येथील पथकर नाक्याला स्थगिती मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली. माणगाव येथील बाह्यवळण रस्त्याची एक मार्गिका गणेशाेत्सवापूर्वी सुरू हाेईल. त्यासाठीची कामे प्रगतिपथावर असल्याचेही त्यांनी सांगितले.