दोन खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठांनामंजूरी: नागपूर, अहिल्यानगरमध्ये सुविधा

    26-Aug-2026
Total Views |

nagpur 
मुंबई, 25 ऑगस्ट (आ.प्र.) :
नागपूरला लता मंगेशकर विद्यापीठ, तर अहिल्यानगरला डाॅ. बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठ अशा दाेन खासगी आराेग्य विज्ञान विद्यापीठांच्या स्थापनेस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
 
नागपूरला व्हीएसपीएम अ‍ॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन संस्थेने खासगी आराेग्य विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव दिला हाेता.
या विद्यापीठात वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, फिजिओथेरपी आणि नर्सिंग विद्याशाखांमधील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम सुरू हाेणार आहे. संस्थेकडे 1138 खाटांचे सुसज्ज रुग्णालय आहे.
 
अहिल्यानगरला डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनने अशा विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव दिला हाेता. या विद्यापीठाकडे वैद्यक विद्याशाखेतील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम शिकवण्याची व्यवस्था आहे; तसेच सर्व सुविधांनी यु्नत असे 830 खाटांचे रुग्णालयही आहे.
 
या दाेन्ही संस्थांच्या विद्यापीठ स्थापनेच्या प्रस्तावांची राष्ट्रीय वैद्यकीय आयाेगाच्या (एनएमसी) मार्गदर्शक तत्त्वांनुसार निरीक्षण समितीने पडताळणी केली. समितीच्या शिफारसीवर मंत्रिमंडळ बैठकीत या दाेन्ही खासगी आराेग्य विज्ञान विद्यापीठांच्या स्थापनेस मान्यता देण्यात आली.