डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक वेळेत पूर्ण करावे : संजय शिरसाट

    26-Aug-2026
Total Views |
 
DR,BABASAHEBAMBEDKAR
मुंबई, 25 ऑगस्ट (आ.प्र.) :
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाचे काम दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करावे. कामाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि वेळेच्या नियाेजनास सर्वाेच्च प्राधान्य देऊन संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.
इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या डाॅ. आंबेडकर स्मारकाच्या कामांचा शिरसाट यांनी आढावा घेतला.
 
स्मारकाच्या विविध भागांत सुरू असलेली कामे, आवश्यक साहित्यांची उपलब्धता, वाढीव कामे; तसेच प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमएमआरडीएचे अतिर्नित आयु्नत पी. वेलरासू, सहसचिव बागुल, अनिल सुतार तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी ऑनलाइन उपस्थित हाेते. प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, साहित्य आणि यंत्रसामग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावी.