चाकणचा वीजपुरवठा सक्षम करण्यास तातडीच्या उपाययोजना

महावितरणचे संचालक औंढेक ऑन फिल्ड : दोन रोहित्रे सुरू

    26-Aug-2026
Total Views |

MIDC 
चाकण, 25 ऑगस्ट (आ.प्र.) :
चाकण औद्याेगिक क्षेत्रातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरणने वीजयंत्रणा सक्षमीकरणाच्या उपाययाेजनांना गती दिली आहे.
 
महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर यांनी चाकण एमआयडीसी परिसरातील वीज यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला; तसेच 33/22 केव्ही भांबाेली आणि ह्युंदाई उपकेंद्रांमध्ये प्रत्येकी 10 एमव्हीए क्षमतेची राेहित्रे सुरू केली. या अतिर्नित राेहित्रांमुळे चाकण औद्याेगिक क्षेत्रातील वीजपुरवठा अधिक सक्षम हाेण्यास मदत हाेणार आहे.
 
ह्युंदाई येथील केंद्र यापूर्वी केवळ स्विचिंग स्टेशन म्हणून कार्यरत हाेते. वाढत्या औद्याेगिक वीजभाराचा विचार करून त्याचे 33/22 केव्ही उपकेंद्रात रूपांतर करण्यासाठी मुख्य अभियंत्यांनी पाठपुरावा केला. त्यास संचालक धनंजय औंढेकर यांनी तातडीने मंजुरी दिली. त्यानुसार ह्युंदाई केंद्राचे 33/22 केव्ही उपकेंद्रात रूपांतर करून ते सुरू करण्यात आले. त्याचबराेबर 33/22 केव्ही भांबाेली उपकेंद्रात अतिर्नित 10 एमव्हीए क्षमतेचे राेहित्र सुरू करण्यात आले आहे. चाकण औद्याेगिक क्षेत्राचा झपाट्याने हाेत असलेला विस्तार आणि भविष्यातील वाढती विजेची मागणी लक्षात घेऊन महावितरण व महापारेषण अधिकाऱ्यांनी समन्वयाने कामे गतीने पूर्ण करावीत. भविष्यातील वीज मागणीचे अचूक नियाेजन करून औद्याेगिक ग्राहकांना विश्वासार्ह व दर्जेदार वीजपुरवठा देण्यासाठी आवश्यक उपाययाेजना कराव्यात, असे निर्देश औंढेकर यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी महावितरण व महापारेषणचे वरिष्ठ अभियंते उपस्थित हाेते.
 
औंढेकर यांनी महापारेषणच्या 400 केव्ही चाकण, 220 केव्ही ब्रिजस्टाेन आणि 220 केव्ही चाकण फेज-2 या अतिउच्चदाब उपकेंद्रांचीही पाहणी करून आगामी काळातील वीजपुरवठा नियाेजनाचा आढावा घेतला
.
ब्रिजस्टाेन उपकेंद्रात 50 एमव्हीए क्षमतेचे राेहित्र नुकतेच सुरू करण्यात आले; तसेच 400 केव्ही चाकण उपकेंद्रात 22 केव्हीचे चार अतिर्नित फीडर उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती महापारेषणच्या अभियंत्यांनी दिली.
 
220 केव्ही चाकण फेज-2 उपकेंद्रात अतिर्नित 100 एमव्हीए क्षमतेचे राेहित्र बसवण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या उपाययाेजनांमुळे चाकण औद्याेगिक क्षेत्रातील वाढत्या वीज मागणीची पूर्तता करण्यासाठी महावितरण व महापारेषणची यंत्रणा अधिक सक्षम हाेणार आहे.