तमाेगुणी माणूस स्वत: भक्ती करीत नाही; दुसऱ्याने भक्ती केलेलीही त्याला पाहवत नाही व म्हणून त्यात विघ्ने आणण्याचाच ताे प्रयत्न करताे.
देवालये माेडावी, फळझाडे आणि फुलझाडे यांचा विनाकारण विध्वंस करावा, काेणी चांगले कृत्य करीत असेल तर त्यात अडथळा निर्माण करावा अशी याची कुबुद्धी असते. नखे वाढवणे, कळकटपणे राहणे, मलिन वस्त्रे लेणे, अचावचा खाणे, उद्धटपणे बाेलणे, वडिलधाऱ्यांचा मान न ठेवणे अशा दुर्गुणांनी ताे यु्नत असताे.
तमाेगुणी माणसे चुकून कधी तरी चुकीच्या साधनमार्गाला लागतात. मग ती चेटूक, जारणमारण, भानामती, शरीरत्रासाचे हठयाेग, अंगात सुया टाेचून घेणे, अग्नीवरून चालणे, धुरी घेणे, शरीर पीडा करून घेणे असे अघाेरी साधन करू लागतात. त् यामागे त्यांच्या स्वत:चा उद्धार हाेण्याचा विशुद्ध हेतू नसताे, तर दुसऱ्याला त्रास देणे हेच ध्येय असते. त्या मार्गाने जाऊन ते स्वत:चाच घात करून घेत असतात.
निष्ठुरपणाने वागून दुसऱ्याला त्रास देण्यात त्यांना विकृत समाधान मिळत असते. मनुष्यजन्म भाग्याने मिळाला आहे त्याचे सार्थक करावे हा विचारही त्यांच्या मनास शिवत नाही व ते देहाेपभाेगात आणि संसारसुखातच रंगून जातात.