पतिसेवा हाच आपला धर्मŸ। प्रपंचाचे कर्तव्य हेच आपले सत्कर्मŸ।। अंतरी समाधान हेच आपले साधन Ÿ।। सर्वांनी राहावे सुखीŸ। रामनाम नित्य घ्यावे मुखीŸ।। सर्व सुखाचा लाभŸ। घर बसल्या मिळताे देवŸ।। कर्तव्यी असावे तत्पर । मुखी नाम निरंतरŸ।। देहाने करावी सेवाŸ। याहून दुजा लाभाचा नाही ठेवाŸ।। परमात्म्याने जे जे दिलेŸ। ते ते त्याचे म्हणून सांभाळणे भलेŸ।। त्या लाेभात न गुंतवावे चित्त हाच परमार्थ सत्यŸ।। नसावे कशाचे ज्ञानŸ। वाटावे सदा घ्यावे रामनामŸ।। प्रपंची राहावे समाधानŸ। हेच भक्ताचे मुख्य लक्षण जाणŸ।।
पतिव्रता साध्वी थाेर थाेरŸ। त्यांचे करावे स्मरणŸ। जे करील पुण्यवान Ÿ।। तुमच्या पतिसारख्यांची संगतिŸ।। हीच भाग्याची खरी प्राप्तिŸ।। त्यांच्या आज्ञेने वागावेŸ। त्यांच्या सुखात आपले सुख पहावेŸ।। रामावर ठेवावा विश्वासŸ। सुखाने करावा संसारŸ।। राम धरिता चित्ती। प्रपंचाची काळजी त्याचे हातीŸ।। प्रपंची असावे खबरदारŸ। परी लाेभात न गुंतावे अंतरŸ।। धन संग्रही राखावेŸ। सर्वच खर्चून न टाकावेŸ। ही प्रपंचाची रीतŸ। सर्व जगात आहे चालतŸ।। जगाची रीत लाेभात असणेŸ। हे मात्र आपणास न आवडावेŸ।। देहाने पतिसेवा करावीŸ।। ध्यानी धरावा रामरायाŸ। त्याचा संसार उत्तम झालाŸ। हाच आशीर्वाद माझा भलाŸ।। प्रपंचाची संगतिŸ। काळजीची उत्पत्तीŸ। तेथे धरिता नामाची संगति । काळजीविरहित आनंद देईŸ।। मुलींच्या लग्नाची काळजी करू नयेŸ। प्रयत्नाला साेडू नयेŸ। प्रयत्नाअंती परमेश्वर। हे सज्जनांचे बाेलŸ। मनी ठसवावे खाेलŸ।। आरंभी ज्याने स्मरला रामŸ। त्यालाच प्रयत्नाअंती रामŸ। हा ठेवावा विश्वासŸ। सुखे साधावे संसारासŸ।। मिष्ट भाषण वरिवरीŸ। विष आहे अंतरीŸ। असल्याची संगत नसावी बरीŸ।। वृद्धपण आलेŸ। शरीर क्षीण झालेŸ। तरी आपण अभिमान घेऊनच राहिलेŸ। त्यास साेडावे दूरŸ।। मी तुम्हास सांगताे हितŸ। दृश्यांत न ठेवावे चित्तŸ।। रांमसेवेकरता प्राणŸ। म्हणून करणे आहे जतनŸ।। मान अपमान जगतातŸ। ते मूळ कारण झाले घातासŸ।। काेणतेही काम करीत असताŸ। राखावी मनाची शांतताŸ।। अगदी व्यवहारबुद्धिने कामे करावी सर्वथाŸ।। आप्तइष्ट सखेसज्जन । यांचे राखावे समाधान । परी न व्हावे त्यांचे आधीनŸ।। सर्वांशी राहावे प्रेमानेŸ। चित्त दुश्चित्त न व्हावें कशानेŸ।। आल्या अतिथा अन्न द्यावेŸ। काेणास विन्मुख न पाठवावेŸ।। अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावेŸ। त्यात रामाचे अधिष्ठान राखावेŸ।। रामावर ठेवावा विश्वासŸ। सुखाने करावा संसारŸ।।