परभणी, 20 ऑगस्ट (आ.प्र.) :
‘इन्व्हेस्ट इन परभणी’ उपक्रमांतर्गत पार पडलेल्या गुंतवणूक परिषदेत 162 उद्याेजकांसाेबत सुमारे 1622 काेटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या प्रस्तावित गुंतवणुकीच्या माध्यमातून पंधरा हजारांहून अधिक राेजगाराच्या संधी निर्माण हाेणार असल्याचा विश्वास या वेळी व्य्नतकरण्यात आला.
येथे नुकतीच गुंतवणूक परिषद पार पडली. या वेळी पालकमंत्री मेघना साकाेरे बाेर्डीकर, खासदार रामराव वडकुते, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्यासह उद्याेजक उपस्थित हाेते.
जिल्ह्यातील उपलब्ध साधनसंपत्ती, अकुशल मनुष्यबळाला प्रशिक्षण देऊन स्थानिक पातळीवरच काैशल्य विकसित करण्यात येईल आणि उद्याेगांसाठी असलेल्या संधींचा उपयाेग करून अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्यात येईल. येत्या दसऱ्यापर्यंत या उद्याेगांच्या बांधकामाची पायाभरणी करण्यात येईल. या गुंतवणुकीतून स्थानिक उद्याेजकांना चालना मिळेल, असे साकाेरे-बाेर्डीकर यांनी सांगितले.
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्याेगांच्या माध्यमातून जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात गुंतवणूक आणली जात असून, मुख्यमंत्री राेजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सुमारे 80 हजार नाेंदणी झाल्या आहेत. गुंतवणुकीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, वित्तपुरवठा, अनुदान व पात्रता याबाबत उद्याेजकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. विविध सामंजस्य करारांची प्रक्रिया एकखिडकी पद्धतीने सुलभ करण्यावर भर देण्यात येत आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली.