दहीहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार : अॅड. आशिष शेलार

    21-Aug-2026
Total Views |

shelar 
मुंबई, 20 ऑगस्ट (आ.प्र.) :
दहीहंडी उत्सवाला युनेस्काेच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळावे, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी येथे दिली.
 
राज्यातील दहीहंडी पथक, गाेविंदा आणि दहीहंडी उत्सवासाठी स्थापन झालेल्या राज्य दहीहंडी गाेविंदा असाेसिएशनने आयाेजिलेल्या ‘कृष्णानंद साेहळ्या’त अ‍ॅड. शेलार यांनी ही माहिती दिली. गाेविंदांना स्पेनलाही पाठवणार असल्याची घाेषणा त्यांनी केली. तसेच, उत्सव साजरे करताना सुरक्षेच्या नियमांचे काटेकाेर पालन करा, असे आवाहनही त्यांनी मंडळांना केले.
 
या वेळी असाेसिएशनचे अध्यक्ष बाळा पडेलकर, कार्याध्यक्ष सुरेंद्र पांचाळ, सचिव गीता झगडे, अभिषेक सुर्वे यांसह महाराष्ट्रातील महिला व पुरुष दहीहंडी पथके, गाेविंदा, तसेच दहीहंडी उत्सवासाठी कार्यरत विविध संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित हाेते.