समृद्ध भविष्यासाठी महाराष्ट्र गुंतवणूकदारांचे प्रवेशद्वार

इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या परिषदेत मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

    20-Aug-2026
Total Views |

investment 
मुंबई, 19 ऑगस्ट (आ.प्र.) :
गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या विकासात भारत आणि जगाच्या जाेडणीसाठी महाराष्ट्र प्रवेशद्वार आहे. भविष्यातील विविध क्षेत्रांतील गरजा लक्षात घेता महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता संशाेधन आणि विकास, डेटा सेंटर, ग्लाेबल कॅपॅबिलिटी सेंटरसाेबत पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. त्यामुळे समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी गुंतवणूकदारांचे महाराष्ट्र हे यशस्वी डेस्टिनेशन असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
 
राज्यातील विविध क्षेत्रांतील संधींचा लाभ घेत अमेरिकेतील गुंतवणूकदारांनी आपल्या कल्पना, संशाेधन घेऊन महाराष्ट्रात यावे. राज्य शासन त्यांना येथील काैशल्य, बाजारपेठ, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.
इंडाे-अमेरिकन चेंबर ऑफ काॅमर्सच्या राष्ट्रीय परिषदेत मुख्यमंत्री बाेलत हाेते. भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गाेर, उत्तर प्रदेशाचे राज्यमंत्री दिनेशप्रताप सिंह, इंडाे-अमेरिकन चेंबरचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुप आचार्य, कार्यकारी उपाध्यक्ष प्रशांत कृष्णन, उपासना अराेरा, अवनीश अवस्थी आदी यावेळी उपस्थित हाेते.
 
भारत आणि अमेरिकेतील संबंध दृढ आहेत.
भविष्यातील आव्हानांचा विचार करता दाेन्ही देशांतील भागीदारी महत्त्वाची ठरणार आहे. पुढील काळात दाेन्ही देशांना आर्थिक संबंध वाढवण्यार भर द्यावा लागणार आहे, असे गाेर यांनी सांगितले.
अनुप आचार्य, दिनेशप्रताप सिंह, चैंबरच्या पश्चिम भारत परिषदेचे क्षेत्रीय अध्यक्ष राघवेंद्र पाेंक्षे, दक्षिण क्षेत्राचे अध्यक्ष प्रभू बाला यांनी मनाेगत व्य्नत केले.
 
उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार काैस्तुभ धवसे आणि महाराष्ट्र सायबरचे अतिर्नित पाेलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.