पराेपकार म्हणजे काय, नि:स्वार्थी भावनेने केलेले काम म्हणजे काय असते आणि जिद्द आणि मेहनत कशाला म्हणतात हे पाहायचे असेल, तर बिहारमधील दशरथ मांझी या अतिसामान्य, महादलित कुटुंबातून आलेल्या व्य्नितमत्त्वाच्या कार्याकडे पाहिल्यावर लक्षात येते. त्यांची जिद्द व मेहनत यांना सलाम करण्यासााठी खराेखरंच काळकभिन्न पहाडही झुकला.
बिहारमधील गया जिल्ह्यातील गेहलाैर खेड्यात एका मजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबात मांझी यांचा जन्म झाला.
गया जिल्ह्यातील आटरी आणि वजीरगंज या दाेन तालुक्याच्या ठिकाणांना जाेडणाऱ्या रस्त्याच्या आड आलेला डाेंगर अक्षरशः त्यांनी छिन्नी-हाताेडा घेऊन ाेडला. सलग बावीस वर्षे ते हे काम करत हाेते. त्यांच्या या अजाेड कामामुळे या दाेन्ही शहरांतील अंतर 55 किलाेमीटरवरून फक्त 15 किलाेमीटरवर आले.
अत्यंत प्रतिकूल परिस्थिती ः 1959 मध्ये दशरथ मांझी यांच्या पत्नीचे निधन झाले. वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने पत्नीचे निधन झाल्याची बाेच त्यांच्या मनाला लागली.
त्यांच्या गावापासून डाॅक्टर असणारे जवळचे शहर 70 किलाेमीटर अंतरावर हाेते. हा सगळा रस्ता डाेंगरकड्यातून जाणारा हाेता. मग त्यांनी या रस्त्यापेक्षा गेहलाैर गावाजवळील डाेंगर ाेडून पलीकडच्या रस्त्याला जाेडण्याचे काम हाती घेतले. डाेंगर ाेडून रस्ता करायचा असा निर्धार त्यांनी केला हाेता. जेणेकरून गावातील लाेकांना वैद्यकीय उपचारांसाठी लांबचा प्रवास करावा लागू नये.
हे अविश्वसनीय काम हाती घेतले खरे, पण ते तेवढे साेपे नव्हते. त्यासाठी त्यांना राेजचा राेजगार साेडून द्यावा लागला. स्वतःकडच्या शेळ्या-मेंढ्या विकून त्यांनी छिन्नी-हाताेडा हातात घेतला. डाेंगरावरच कामाच्या ठिकाणी झाेपडे बांधून राहू लागले. अशा प्रकारे ते रात्रंदिवस काम करत राहिले. या काळात त्यांच्या कुटुंबीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अनेकदा तर दशरथ मांझी पाेटात अन्नाचा कण नसताना काम करत असत. लाेक त्यांचे काम पाहायला येत. त्यांच्या या कामाची गावात चर्चा सुरू झाली. काही जण त्यांना वेड लागले असल्याच्या गप्पा मारू लागले. काही जण त्यांच्यावर टीका करत. पण, ते त्यांच्या निश्चयापासून आणि निर्धारापासून जराही ढळले नाहीत.
जसजसे रस्त्याचे काम पुढे जात गेले, तसतसा त्यांचा उत्साह आणखी वाढत गेला. त्यांनी एकट्याने डाेंगर ाेडून 360 ूट लांबीचा आणि 30 ूट रुंदीचा रस्ता तयार केला. त्यासाठी त्यांना खिंड खाेदावी लागली. त्या खिंडीची उंची आहे 25 ूट. त्यामुळे आटरी आणि वजीरगंज या गावांमधील अंतर फक्त 15 किलाेमीटरवर आले.
पत्नीच्या प्रेरणेतून कामाला सुरुवात पत्नी ाल्गुनी देवी यांच्या प्रेरणेतून त्यांनी हे काम केले. काम पूर्ण झाले तेव्हा ते पाहायला त्यांची पत्नी नव्हती.
किंबहुना काम सुरू हाेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले हाेते. रस्ता झाल्यावर गावातील लाेकांनी त्यांचा जयजयकार केला, मिठाई वाटली.
त्यांचे अभिनंदन केले. डाेंगराला वाकवणाऱ्या या देवदूताच्या कहाण्या लाेक सांगू लागले. गावकरी त्यांना साधूजी म्हणून संबाेधू लागले. दशरथ मांझी म्हणतात, ‘माझ्या कामाची प्रेरणा ही माझी पत्नी आहे. तिच्यावरील प्रेमातूनच माझ्याक़डून हे काम घडले.
तिच्या प्रेमानेच मला डाेंगर ाेडून रस्ता बनवण्याची प्रेरणा दिली. जेणेकरून ार कष्ट न पडता लाेकांना वैद्यकीय उपचारांसाठी शहरापर्यंत जाता यावे.
अविश्वसनीय काम त्यांना हे काम करण्यासाठी तब्बल 22 वर्षे लागील. 1960 ते 1982 या काळात त्यांनी हे अविश्वसनीय काम केले. वयाच्या 73 व्या वर्षी 17 ऑगस्ट 2007 राेजी त्यांचे कर्कराेगाने दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत निधन झाले. बिहार सरकारने त्यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार केले.