ड्राय आईज सिंड्राेम : डाेळे सुकणे एक अशी समस्या आहे ज्यात डाेळ्यांच्या अश्रू बनवणाऱ्या ग्रंथी वेगाने व याेग्य प्रमाणात अश्रू बनवू शकत नाही. केटकंजंक्टिव्हिटीस सिक्काइस नावानेही ओळखल्या जाणाऱ्या या आजारात डाेळ्यांमध्ये खाज, जळजळ, लाली व सूज येते. कधी कधी या कारणांमुळे कमी दिसू लागते.
अश्रू येणे : या आजारात डाेळे प्र्रकाश, हवा आणि तापमानात बदलासाठी खूप संवेदनशील हाेतात आणि डाेळ्यांमधून खूप जास्त पाणी येऊ लागते. कधी कधी सनग्लासेसने व आपले डाेळे झाकून या आजारापासून वाचता येऊ शकते. काही वेळा डाेळ्यांतून सतत पाणी येणे एखाद्या गंभीर समस्येचेही लक्षण असू शकते.
कंजंक्टिवायटिस : यामध्ये पापण्याच्या आतील बाजू व काॅर्निया झाकणाऱ्या टिश्यूत सूज येते. याला पिंक आय, डाेळे येणेही म्हणतात. याचे मुख्य लक्षण डाेळ्यांमध्ये लाली, खाज, जळजळ, अश्रू, चिखल व वेगाने टाेचणे आहे. हा आजार सर्व वयातील लाेकांना हाेऊ शकताे.
याचे कारण संक्रमण, रसायनाशी संपर्क व उत्तेजित पदार्थ वा अॅलर्जी असते.
काॅर्नियल डिसीज : काॅर्निया, डाेळ्यांसमाेर स्पष्ट व घुमटाचा आकाराचा असताे. हा डाेळ्यांवर पडणाऱ्या प्रकाशावर ाेकस करण्यास मदत करताे. इतर एखादा आजार, संक्रमण, दुखापत वा एखाद्या टाॅक्सिक पदार्थाच्या संपर्कात आल्यास काॅर्निया क्षतिग्रस्त हाेताे. ज्यामुळे डाेळे लाल हाेणे, डाेळ्यांमध्ये पाणी, वेदना, दृष्टी मंदावणे व हॅलाे इेक्टसारखी समस्या हाेऊ शकते.
पापण्यांची समस्या : आपल्या पापण्या आपल्या डाेळ्यांचे रक्षण करतात. याच अश्रू वितरण व डाेळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित करतात.
वेदना, खाज, अश्रू व प्रकाशासाठी डाेळे संवेदनशील हाेणे ही याची सामान्य लक्षणे आहेत. आयलॅशजवळ पापण्यांच्या बाहेरील कडांवर सूज यासारखी समस्याही आढळते.