खरे सुख तर ते असते जे काेणत्याही सुखसाधनाशिवाय चिरकाल टिकते.
सत्याचा हा साक्षात्कारही सर्वांनाच हाेताे असे नाही.
काही अभागी तर त्याशिवायच सुख सुख म्हणत दु:खातच शेवटचा श्वास साेडतात. अशांना सख्यासाेब त्यांच्या सुखदु:खाचे साेयरसुतक नसते, पराेपकारांची भावना नसते, गुणवान लाेकांचा आदर नसताे आणि भ्नती नसल्यामुळे परमेश्वराचे प्रेम तर नसतेच नसते. अशा लाेकांची संभावना श्रीसमर्थांनी ‘‘ते जीतचि प्रेतासमान’’ म्हणजे जिवंत असूनही मेल्यासारखेच असतात अशी केली आहे आणि ज्यांना आयुष्याचे सार्थक करावयाचे आहे अशा सद्विचारी माणसांनी अशा अपवित्र माणसांशी संभाषणही करू नये, असा इशाराही दिला आहे.
शेवटी ज्याची तेवढी पुण्याई असेल त्यालाच परमश्वराचे प्रेम लाभेल व ताे उद्धरून जाईल, असे सांगून श्रीसमर्थ म्हणतात की यासाठी शुद्ध मनाने विचार करून विवेकाने भक्तिमार्ग धरावा आणि मिळालेला मनुष्यजन्म सार्थकी लावावा! -
प्रा. अरुण गाेडबाेले,
माे. 9822016299