वाच्यार्थ : ज्याप्रमाणे कमाई करून प्राप्त केलेले धन याेग्य कारणासाठी खर्ची घालणे म्हणजेच त्याचे रक्षण करणे हाेय. तलावादी (विहीर, आड इ.) जलाशयातून पाणी घेतल्यानेच जलशुद्धी हाेते, त्याप्रमाणे.
भावार्थ : अर्जितधन व जलाशय यांच्यातील समानता इथे चाण्नयांनी सांगितली आहे.
1. आया ः धन कमावण्याबराेबरच त्याचा व्यय करणेही आवश्यक आहे. कारण ‘धन’ हे आवश्यक (साधन) असल्याने ते मिळवावे लागते अन्यथा त्याचा काय उपयाेग? धन कमावून आपल्या गरजा पूर्ण कराव्यात.