खूप श्रम केल्यावर घाम येण्यामागची कारणे

    13-Aug-2026
Total Views |
 
sweating
खूप खेळल्याने, धावल्याने व्यायाम हाेताे. शरीरातील स्नायुंचे माेठ्या प्रमाणावर आकुंचन प्रसरण हाेते.
स्नायुंचे कार्य वाढते. साहजिकच या भाैतिक श्रमांमुळे उष्णता निर्माण हाेते.
 
अशा परिस्थितीत शरीराचे तापमान ठरावीक पातळीवर स्थिर राहण्यासाठी शरीरातून उष्णता बाहेर टाकण्याची आवश्यकता असते.
व्यायामामुळे निर्माण झालेल्या उष्णतेच्या परिणामाने त्वचेखालचा रक्तप्रवाह वाढताे. त्यामुळे त्वचेचे तापमान हवेच्या तापमानापेक्षा जास्त हाेते व काही उष्णता वातावरणात साेडली जाते; परंतु उष्णतेतील या मार्गाने हाेणारी घट अल्प प्रमाणातच असते. व्यायामानंतर निर्माण हाेणारी उष्णता शरीराबाहेर टाकण्याचा महत्त्वाचा मार्ग घाम हाच हाेय. खूप व्यायाम केल्यानंतर घाम येण्याचे प्रमाण वाढते व त्याबराेबरच घामाचे बाष्पीभवन हाेण्याचेही प्रमाण वाढते.
 
शरीरातील वाढलेली उष्णता व मेंदूतील प्रेरणा या दाेहाेंमुळे व्यायामानंतर आपल्याला खूप घाम येताे. विश्रांती घेतल्यावर हळूहळू घाम येण्याचे प्रमाण कमी हाेते.
 
अशा प्रकारे घाम आल्याने शरीरात निर्माण झालेली उष्णता शरीराबाहेर टाकली जाते व शरीराचे तापमान सामान्य पातळीत राहते.
त्यामुळेच खूप व्यायाम केल्यावर घाम येताे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घाम आणखीनच येताे व हिवाळ्यात तेवढाच व्यायाम करून घाम कमी येताे, याचा अनुभव तुम्ही घेतला असेल.