श्री दासबोध नित्यपाठ

पुण्यसामग्री पुरती। तयासीच घडे भगवद्भक्ती ।।१।।

    13-Aug-2026
Total Views |

RamdasSwami 
दुसऱ्या दशकाच्या ‘‘भ्नितनिरूपण’’ या चाैथ्या समासाचा उपसंहार करताना श्रीसमर्थ भक्तिमार्गाला न लागलेल्या माणसांच्या वर्तणुकीचे वर्णन सांगतात. त्यामागे त्यांचा हेतू हे वर्णन ऐकून तरी माणसांनी सन्मार्गाला लागावे हाच आहे. प्रारंभी सांगितल्याप्रमाणे भगवंतप्राप्तीच्या ध्येयाने प्रेरित हाेऊन आत्महित साधण्यासाठी जाे मार्ग सांगितला आहे ताे साेडून वागणारी माणसे आपल्या मनुष्यजन्माचे सार्थक न करता ताे व्यर्थ दवडतात. त्यांचे जगणे हे खरा विचार केला तर मृतप्रायच म्हणावे लागेल.
 
अशी माणसे भजन, पूजन, देवतार्चन तर साेडाच, पण परमेश्वराची मानसपूजाही करीत नाहीत. त्यांची जीवनशैली केवळ ऐहिक सुखाेपभाेग घेणारी स्वच्छंदी असते. उत्तम गुण, ज्ञान, भ्नती, वैराग्य यांचा लवलेशही त्यांच्यापाशी नसताे. एखादी कला, विद्या अगर शास्त्र यांचीही ते उपासना, आराधना आणि अभ्यास करीत नाहीत. त्यांची राहणी अमंगळ आणि विचार अपवित्र असतात.
 
चांगल्याची संगत धरणे, चांगले विचार ऐकून त्याप्रमाणे आचरण सुधारणे, एखाद्या सत्पुरुषाची दीक्षा घेऊन संतसंग करणे या साऱ्यापासून ही माणसे लांब असतात. याेग नाही, वैराग्य नाही, श्नती नाही, बुद्धी नाही, शास्त्रज्ञान नाही, आत्मज्ञान नाही अशी त्यांची हीनदीन अवस्था असते. कधी कधी बाह्यात्कारी ही माणसे वैभवात आणि सुखात असलेली दिसतात; पण अंतर्यामी कायम धास्तावलेली, अतृप्त आणि असमाधानी असतात. सुख भाेगात नाही तर त्यागात आहे, हे तत्त्वच न उमगल्यामुळे ती सुखाची साधने गाेळा करण्यासाठी संपूर्ण आयुष्य घालवितात आणि कदाचित शेवटी अंतकाळी त्यांच्या लक्षात येते की, आपण जी जमविली ती सुखाची केवळ साधने हाेती.
खरे सुख त्यात नव्हते.