चाणक्यनीती

    13-Aug-2026
Total Views |

Chankya 
2. माणूस ः माणसाने आपल्या आश्रयदात्याला कधी विसरू नये.
माणसाला केवळ अन्न, वस्त्र, निवारा असून चालत नाही. त्याच्या बुद्धीला, भावभावनांना आत्म्यालाही खाद्य हवे असते. त्याचे संस्कार त्याला ‘स्वार्था’कडून ‘परमार्था’कडे नेतात. ‘काम सराे अन् वैद्य मराे’ असे वागणे त्याला शाेभत नाही. त्याच्याजवळ कृतज्ञता भाव असणे, स्वार्थ त्यागाची भावना असणे अपेक्षित आहे.
कारण ताे सर्व प्राणिजगतात ‘वेगळा’ आहे; त्यामुळे त्याची जगण्याची रीतही वेगळीच असणार!
 
बाेध ः मानवाने काही जीवनमूल्ये जपलीच पाहिजेत.
त्यातच त्याचे हित असते.