सिंगापूरची कंपनी तिसऱ्या मुंबईचा आराखडा करणार

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरबाना ज्युरोंग व एमएमआरडीएत करार

    12-Aug-2026
Total Views |

mmrda 
मुंबई, 11 ऑगस्ट (आ.प्र.) :
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) अटल सेतूच्या पायथ्याशी तिसरी मुंबई वसवणार आहे. या तिसऱ्या मुंबईचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी राज्य सरकारने सिंगापूरमधील आघाडीच्या सुरबाना ज्युराेंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडवर साेपवली आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एमएमआरडीए व सुरबाना ज्युराेंग यांच्यात नुकताच करार करण्यात आला. त्यामुळे आता आराखडा तयार करण्याचा मार्ग माेकळा झाला असून, 30 आठवड्यांत आराखडा पूर्ण करण्यात येणार आहे.
एमएमआरडीएने अटल सेतू प्रभावित क्षेत्रात तिसरी मुंबई वसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एमएमआरडीएची 323.44 चाै. किमी क्षेत्रासाठी विशेष नियाेजन प्राधिकरण म्हणून नियु्नती करण्यात आली आहे. तिसऱ्या मुंबईचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी जागतिक स्तरावरील आघाडीच्या सिंगापूरमधील सुरबाना ज्युराेंग कंपनीची नियु्नती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत यासाठी करार करण्यात आला. एमएमआरडीएचे महानगर आयु्नत डाॅ. संजय मुखर्जी व सुरबाना ज्युराेंगचे दक्षिण आशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश मिश्रा यांनी करारावर स्वाक्षरी केली.
 
राज्य सरकारच्या निर्णयानुसार ही कंपनी दाेन टप्प्यांत तिसऱ्या मुंबईचा आराखडा तयार करणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी कंपनीला 11.89 काेटी रुपये, तर दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी 23.12 काेटी रुपये दिले जाणार आहेत. काेणत्या भागात काेणत्या स्वरूपाचा भूवापर असेल, विकासाची प्रमुख केंद्रे काेठे असतील आणि भविष्यात शहराचा विस्तार काेणत्या दिशेने हाेईल, यासंबंधीचा अभ्यास करून आराखडा तयार केला जाणार आहे; तसेच प्रादेशिक, शहरांतर्गत वाहतूक जाेडणी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, विविध वाहतूक साधनांमधील समन्वय, सार्वजनिक वाहतूक केंद्रित विकासाच्या संधींचे नियाेजन कंपनीकडून केले जाईल.
पाणीपुरवठा, पावसाच्या पाण्याचा निचरा, घनकचरा व्यवस्थापन, वीज, गॅस, सामाजिक पायाभूत सुविधा, जलस्राेत व हरित क्षेत्रांच्या जाळ्याचे नियाेजनही केले जाणार आहे.