मुंबईत घरे महागडी, तरीही ९९ टक्के सदनिकांची विक्री

म्हाडा मुंबई मंडळाच्य सोडतीस नागरिकांच उत्स्फूर्त प्रतिसाद

    12-Aug-2026
Total Views |
 
mhada
मुंबई, 11 ऑगस्ट (आ.प्र.) :
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2640 घरांसाठी रंगशारदा सभागृहात साेडत पार पडली. या साेडतीसाठी 75127 अर्ज सादर झाले हाेते. मध्यम आणि उच्च गटातील महागड्या घरांना प्रतिसाद कमी मिळाला हाेता. 304 घरांसाठी शून्य प्रतिसाद मिळाला हाेता. मात्र तरीही प्रत्यक्षात साेडतीत 2640 घरांपैकी केवळ सात घरे शिल्लक राहिली. एकूण घरांपैकी 99 ट्नके घरांची विक्री झाली. प्रतिसाद न मिळालेली महागडी घरे साेडतीत सर्वसाधारण प्रवर्गासाठी (सामाजिक आरक्षण वगळता) वळवण्यात आली. त्यामुळे यावेळी घरे महाग असतानाही साेडतीत केवळ सातच घरे शिल्लक राहिली.
मंडळाच्या 2640 घरांच्या साेडतीतील घरे महाग असल्याने म्हाडावर टीका झाली.
 
परिणामी, साेडत प्रक्रिया सुरू असतानाच विक्राेळीतील घरांच्या किमती साडेसात ट्न्नयांनी कमी करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला. किमती कमी करूनही घरांना प्रतिसाद मिळाला नाही. 2640 पैकी 304 घरांसाठी एकही अर्ज सादर झाला नव्हता.
304 घरांपैकी 225 घरे उच्च उत्पन्न गटातील, 33 घरे मध्यम गटातील आणि 30 घरे अल्प, तर 7 घरे अत्यल्प गटातील हाेती. 304 घरांना शून्य प्रतिसाद मिळाला, तरी प्रत्यक्षात साेडतीत केवळ सात घरेच शिल्लक राहिल्याची माहिती मंडळाने दिली.
 
शून्य प्रतिसाद मिळालेल्या घरांपैकी 298 घरे सामाजिक आरक्षण वगळता इतर प्रवर्गातील आरक्षित घरे हाेती. नियमानुसार सामाजिक आरक्षण वगळता इतर प्रवर्गातील घरे साेडत काढताना सर्वसाधारण गटात वळवता येतात. त्यानुसार 298 घरे सर्वसाधारण गटात वळवून त्यांची साेडत काढण्यात आली. त्यामुळे शून्य प्रतिसाद मिळालेली 298 घरेही विकली गेली.
 
चालू बांधकाम प्रकल्पातील आणि 33 (5) याेजनेंतर्गत मिळालेली सर्व घरे विकली गेली. 33 (7) याेजनेंतर्गत मिळालेली दाेन आणि विखुरलेल्या घरांच्या याेजनेतील 5 घरांची विक्री झालेली नाही. माटुंग्यातील आनंद हाइट्समधील 49 घरे विक्रीसाठी हाेती. त्यानुसार या घरांसाठी 47 अर्ज आल्याने दाेन घरे विक्रीवाचून रिक्त राहिली.
 
भायखळ्यातील आरडी प्राॅपर्टीजमधील 4 घरांसाठी 3 अर्ज आल्याने 1 घर रिक्त राहिले. वडाळ्यातील आनंद हाइट्समधील 7 घरांसाठी 6 अर्ज आल्याने 1 घर रिक्त राहिले. वडाळ्यातील एका घरासाठी शून्य अर्ज आल्याने हे एक घरही र्नित राहिले आहे. तसेच वडाळा, नाडकर्णी पार्क येथील एका घरासाठी शून्य अर्ज आल्याने हे घरही रिक्त राहिले. रिक्त राहिलेली ही सातही घरे सामाजिक आरक्षणातील आहेत. ही घरे आता आगामी साेडतीत समाविष्ट केली जातील.