वाच्यार्थ : पाण्याच्या ठिकाणी हंस वास करतात. तेथील पाणी आटल्यास हंस ते स्थान साेडतात. (वर्षा ऋतूत) ते स्थान पाण्याने भरल्यावर पुन्हा त्या स्थानाचा राहण्यासाठी आश्रय घेतात; परंतु मानवाने हंसासारखे वागणे याेग्य नाही.
भावार्थ : येथे कृतज्ञता बुद्धीचे महत्त्व सांगितले आहे.
1. हंस ः हंस हा एक पक्षी आहे. राहण्यासाठी त्याला जलाशयाचा आश्रय घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे एका जलाशयातील पाणी आटल्यास त्याला दुसऱ्या जलाशयाच्या शाेधात जावेच लागते. त्याशिवाय त्याचे जगणे दुरापास्त असते. पूर्वीच्या जलाशयात (वर्षा ऋतूत) पाणी भरले की, हंस परत तेथे राहायला येताे. स्थलांतर करणे हे पक्ष्यांसाठी, त्यांच्या जगण्यासाठी आवश्यक आहे.