ज येतां पैं सुभटाŸ। या द्विविधा गा अव्हांटाŸ।
स्वर्गु नरकु या वाटाŸ। चाेरांचिया ।। 9.315
परमेश्वराची प्राप्ती कशासाठी करून घ्यायची? या प्रश्नाचे उत्तर शाेधताना अनेक प्रकारची कारणे दिली जातात. भाैतिक सुख, शारीरिक स्वास्थ्य, यश, कीर्ती इत्यादि लाैकिक लाभांसाठी परमेश्वरास जवळ करावे असे नेहमी मानले जाते. पण ते बराेबर नाही.
भाैतिक सुखासाठी नकाेच; पण जे पारलाैकिक सुख स्वर्गामध्ये मिळते ते स्वर्गसुखही ज्ञानेश्वरांनी दूर सारले आहे. मनात कामना ठेवून यज्ञयाग करणाऱ्या दीक्षितांना ज्ञानेश्वरांनी दाेष दिला आहे. त्यांच्या मताने स्वर्ग व नरक या दाेन्ही वाटा चाेरांच्या आहेत. आश्रमधर्माचे अनुष्ठान करीत असताना, यज्ञ करीत असताना याज्ञिकांचा हेतू काेणता असताे? साेमपान करून यज्ञ करणाऱ्यांनी पुण्याच्या नावे पापाची जाेड केलेली असते. जे ॠग्वेदादि वेदांचे अध्ययन करतात, शेकडाे यज्ञ करतात आणि मला साेडून स्वर्गाला जातात, यज्ञीभाे्नता काेण हे त्यांच्या ध्यानी येत नाही. कल्पतरूच्या खाली बसून झाेळीला गाठ द्यावी त्याप्रमाणे हे हाेते. शंभर यज्ञ करून स्वर्गप्राप्तीची इच्छा मनात धरली तर त्याला अर्जुना, पुण्य म्हणावे काय? मला साेडून स्वर्गाची प्राप्ती हा अज्ञानी माणसाचा पुण्यमार्ग आहे. पण, ज्ञानी माणसे स्वर्गप्राप्तीची इच्छा धरीत नाहीत.
स्वर्गातील सुख म्हणजे काय तर नरकातील दु:खाच्या तुलनेत ते सुख मानले आहे. आणि दु:खरहित आनंद हे तर माझे स्वरूप आहे. म्हणून अर्जुना, स्वर्ग व नरक या दाेन्ही वाटा चाेरांच्या समज. ज्याने परमेश्वर प्राप्त हाेत नाही, ते वरवर पुण्य वाटले तरी खराेखर पापच आहे. अर्जुना, ज्याच्यायाेगी मी प्राप्त हाेताे ते शुद्ध पुण्य हाेय