गांदवलेकर महाराज

जो समाधानी तो भगवंताचा आवडता

    12-Aug-2026
Total Views |

GondavlekarMaharaj 
चित्तांत राखावे समाधानŸ।। चित्तांत ज्याचे राहिले समाधानŸ। ताेच भगवंताचा आवडता जाणŸ।। ज्याचा विश्वास रामावरीŸ। त्याला समाधान स्व ीकारीŸ।। माझे हित रामाचे हाती हा धरिता विश्वासŸ। समाधान मिळत असे जीवासŸ।। दु:ख ही परमात्म्याची इच्छा जाणून जाे भगवंताचा झालाŸ। त्याला देह प्रारब्धावर टाकता आलाŸ।। प्रारब्धाने देहाची स्थितीŸ। हे सर्वच सांगतीŸ। पण त्यात मानता येते सुख समाधानŸ। ध्याता एका रघुनंदनŸ।।
 
तात्पुरते काही तरी औषध घ्यावेŸ। देहाच्या लाेभात न सापडावेŸ।। माझे सांगणे दुजे नाहीŸ।। जाेंवर श्वासाेच्छ्वास देहीŸ। ताेंवर मुखी नाम पाहीŸ। तरीपण मी सांगताे एकŸ। ठेवावा रामावर विश्वासŸ। ताेच साह्यकारी हाेईल खासŸ।। असावे शुद्ध आचरणŸ। करावे भगवंताचे स्मरणŸ।। कर्तव्याची ठेवावी जागृतिŸ। त्यात भगंवताची राखावी स्मृतिŸ।। नामाविण नाही दुजे साधनŸ।।
 
हे सांगत आले सर्व संतजनŸ।। देहाचे अस्तित्व भगवंतासाठी याहून नाही दुजी उच्च प्राप्ति ।। देहाचे भाेग देहाचे माथीŸ। ऐसे सर्व सांगतीŸ।। परी एक वाटतसे चित्ताŸ। ते दूर हाेतील एक भगवंत चिंतिताŸ।। भगवंतावाचून देहाचे सुखभाेगŸ। हे न मानिती साधुसज्जनŸ।। आता जगणे रामासाठीŸ। हा निश्चय मानावा चित्तीŸ।। जगातील वेैभव ऐश्वर्य संपत्तीŸ। लाैकिक आणि कीर्तीŸ। हे परमात्म्यावाचून मातीमाेल साधुसंत गणतीŸ।। आजवर झाले कष्ट ारŸ। देहाचा भरवसा धरून थाेरŸ।। देहाचे सुखसाैख्य आदरसत्कारŸ। हे प्रारब्धाधीन सत्य जाणŸ।। मुलींनी खेळ मांडलाŸ। परि नाही कामाला आलाŸ। तैसा प्रपंच थाेर झालाŸ। परमात्म्याचा ताे न म्हणावा भलाŸ।। जग त्यागी आपणासŸ।। आपण न त्यागावे जगासŸ। हीच देहबुद्धि खास रामापरते सत्य नाहीŸ।। श्रुतिस्मृति सांगतात हेच पाहीŸ।। आता न ठेवावा जगी भरवसा । राम सखां करावा खासाŸ।।
 
रामाविण अन्य प्रीती उपजे देहबुद्धिचे संगतीŸ।। आता रामाएकच करीŸ। तुझा विसर न पडाे अंतरीŸ।। आता जसे असेल तसे हाेऊ द्यावेŸ। रघुनाथजीभजनी असावेŸ।। मागील झाले हाेऊन गेलेŸ। पुढील येणार येऊ द्यावे भलेŸ।। आता न धरावा हव्यासŸ। हेच वाटे जीवासŸ।। जे जे करणे आणिले मनीŸ। रामकृपे पावलाें जगीŸ। माझे आता काहीŸ। दुसरे मागणे नाहीŸ।। माझे काेणी नाही। मी काेणाचा नाहीŸ। जग आणि देह अगदी माझे नाहीŸ।। जे जे काही दृश्य पहावेŸ। त्याचे रूपांतरच व्हावेŸ। हा नेहमीचा अनुभव ठेविता चित्तीŸ। समाधानाची हाेय प्राप्तीŸ।।