चाणक्यनीती

    11-Aug-2026
Total Views |

Chankya 
‘मुकी बिचारी कुणी हाकावी’ अशा प्राण्यांप्रमाणे त्यांच्याशी व्यवहार केला जाताे.
 
2. कपटी स्वभाव ः काही माणसे साधी, सरळ नसतात. काेणी काही बाेलले तरी वाकड्यात शिरतात, भांडायला लागतात, तिरके बाेलतात, टाेमणे मारतात, समाेरच्याला शब्दांनी घायाळ करतात; परंतु अशा लाेकांच्या वाटेला काेणी जात नाही, त्यांना काेणी दुखवत नाही. त्यांना सर्व भिऊनच वागतात. कारण ही माणसे कुरापतखाेर असतात.
 
बाेध : कापायला साेपी असणारी झाडे कापली जातात.
वाकडी झाडे कापण्याचे काम काेणी घेत नाही. म्हणतात ना, ‘अश्वं नैव, गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च। अजापुत्रं बलिर्यच्छेत देवाे दुर्बल घातक:।।’ ‘अरे’ ला ‘कारे’ म्हणता आलेच पाहिले तरच निभाव लागताे.