बारामती, 10 ऑगस्ट (आ.प्र.) :
श्री क्षेत्र मयुरेश्वर गणपती मंदिराचे पुरातन व धार्मिक महत्त्व जपत प्राचीन वास्तूचे मूळ स्वरूप अबाधित ठेवून आधुनिक सुविधांचा समन्वय साधावा. मंदिर परिसरातील विकास व जीर्णाेद्धाराची कामे मंजूर आराखड्यानुसार दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्या.
श्रीमती पवार यांनी माेरगावातील श्री क्षेत्र मयुरेश्वर गणपती मंदिर परिसर; तसेच मेडद येथील (स्व.) अजितदादा पवार शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विकासकामांची माहिती घेतली. श्री क्षेत्र मयुरेश्वर मंदिर परिसरातील कामांचा आढावा घेताना श्रीमती पवार म्हणाल्या, की मंदिराच्या जीर्णाे द्धाराची कामे मंजूर आराखड्यानुसारच करावीत.