आपल्या पुराणांमधून 84 लक्ष प्रकारचे जीव जगात वास करीत असतात, असा उल्लेख आढळताे. या इत्नया प्रकारांपैकी एक म्हणजे मनुष्यजन्म हाेय. त्यामुळे श्रीसमर्थ म्हणतात की, माेठ्या पूर्वपुण्याईने आणि भगवंताच्या कृपेनेच मनुष्य जन्म प्राप्त हाेताे आणि त्यातही त्या माणसाचा भाग्ययाेग असला तरच ताे सन्मार्गाला लागताे. स्नान, संध्या, भगवंताचे स्मरण आणि सद्वासना, पूर्वजन्मांची पुण्यकर्मे आणि मानवजन्मात आल्यानंतरचे विवेकी वागणे यामुळेच माेक्ष प्राप्त हाेताे.
मनुष्य जन्म सार्थकी लावून ऐहिक जीवन संपल्यानंतर जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका हाेऊन ताे माेक्ष मिळवावा, हे प्रत्येकाने आपल्या आयुष्याचे ध्येय ठेवले पााहिजे. त्यासाठी जी साधने सांगितली आहेत त्यामध्ये सर्व प्राणिमात्रांशी दयाभाव, प्रेमभाव व सद्भाव ठेवून वागणे, भगवंताची अनन्यभावे भजन, पूजन, कीर्तन अशा मार्गाने भ्नती करणे महत्त्वाचे आहे. पूर्वपापांचा नाश हाेण्यासाठी दानधर्म, तीर्थाटन, देवदर्शन व संतांचे मार्गदर्शन उपयाेगी पडते.
भगवंताच्या भक्तीचे नऊ मार्ग आपल्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहेत. त्यालाच नवविधा भक्ती म्हणतात. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, पूजन, वंदन, दास्यभक्ती, सख्यभक्ती हे आठ प्रकार व शेवटची आणि सर्वांत उच्च काेटीची नववी भक्ती म्हणजे आत्मनिवेदन हाेय.