घसा बसला असेल तर, कोणते सोपे उपाय करता येतील हे जाणून घ्या

    11-Aug-2026
Total Views |

throat 
घसा बसणे ही बहुतांश वेळा तात्पुरती समस्या असली तरी तिच्याकडे दुर्लक्ष करू नये. याेग्य विश्रांती, पुरेसे पाणी, घरगुती उपाय आणि आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला घेतल्यास आवाज पूर्ववत हाेण्यास मदत हाेते.
आपण दिवसभर बाेलताे, गाताे, हसताे आणि आपल्या भावना व्यक्त करताे. या सर्वांसाठी आवाज हे अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे. परंतु कधी-कधी सर्दी, संसर्ग, सतत माेठ्याने बाेलणे, धूळ-धूर किंवा हवामानातील बदल यांमुळे घसा बसताे आणि आवाजात बदल जाणवू लागताे.
 
अनेकजण याकडे किरकाेळ समस्या म्हणून पाहतात; मात्र याेग्य काळजी घेतली नाही तर ही समस्या वाढू शकते.
घसा का बसताे?
 घसा बसण्यामागे अनेक कारणे असू शकतात.
 विषाणू किंवा जिवाणूंमुळे हाेणारा घशाचा संसर्ग.
 सतत माेठ्याने बाेलणे, ओरडणे किंवा गाणे.
 धूम्रपान व तंबाखूचे सेवन.
 धूळ, धूर किंवा प्रदूषणाचा संपर्क, अ‍ॅलर्जी.
 पाेटातील आम्ल वर येणे (सिड रिफ्लक्स)
 थंड पदार्थांचे अतिसेवन किंवा हवामानातील अचानक बदल.
 
घरच्या घरी काय करावे?
1. आवाजाला विश्रांती द्या : अनावश्यक बाेलणे टाळा. माेठ्याने बाेलणे किंवा कुजबुजणेही टाळावे, कारण त्यामुळे स्वरयंत्रावर अधिक ताण येताे.
2. काेमट पाण्याच्या गुळण्या करा : काेमट पाण्यात चिमूटभर मीठ टाकून दिवसातून तीन ते चार वेळा गुळण्या केल्यास घशातील सूज व वेदना कमी हाेण्यास मदत हाेते.
3. भरपूर पाणी प्या : शरीरात पाण्याची कमतरता हाेऊ देऊ नका. काेमट पाणी, सूप किंवा इतर उबदार द्रवपदार्थ उपयुक्त ठरतात.
4. वाफ घ्या : काेमट पाण्याची वाफ घेतल्याने घशातील काेरडेपणा कमी हाेताे आणि आराम मिळताे.
5. धूम्रपान व मद्यपान टाळा : यामुळे घशाची जळजळ वाढू शकते आणि बरे हाेण्यास अधिक वेळ लागू शकताे.
6. संतुलित आहार घ्या : फळे, भाज्या, जीवनसत्त्व मकफ असलेले पदार्थ आणि पाैष्टिक आहार राेगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात.
 
घसा बसणे ही बहुतांश वेळा तात्पुरती समस्या असली तरी तिच्याकडे दुर्लक्ष करू नये.
याेग्य विश्रांती, पुरेसे पाणी, घरगुती उपाय आणि आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला घेतल्यास आवाज पूर्ववत हाेण्यास मदत हाेते. आपला आवाज ही निसर्गाने दिलेली अमूल्य देणगी आहे. त्याची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.