सोशल एंग्झायटी दूर करण्यासाठी आजमावा या टिप्स

    10-Aug-2026
Total Views |
 
socialanxiety
ट्रगर्स ओळखण्यास, निगेटिव्ह विचार बदलण्यास व लाेकांशी बाेलण्याची भीती कमी हाेऊ शकते. लाेकांशी बाेलण्यात भीती, गर्दीत घबराट वा छाेट्या छाेट्या स्थितींमध्ये असहजता जाणवणे फक्त लाजरेपणा नसून साेशल एंग्झायटीही असू शकते.
 
अशा वेळी एखाद्याशी बाेलणे, पब्लिकमध्ये खाणे वा नव्या जागी जाणेही कठिण वाटू लागते. तशी थेरपी, छाेट्या छाेट्या स्टेप्स आणि ब्रीदिंग ए्नसरसाइज यामध्ये मदत करू शकते.
 
 आपले ट्रिगर्स ओळखा : आपल्याला सर्वांत जास्त भीती केव्हा वाटते ते ओळखा. कित्येकदा लाेकांशी बाेलताना, आपले मत मांडताना वा जज केले जाण्याच्या भीतीने अस्वस्थता वाढू शकते.
 
 लाेकांना टाळण्याची सवय कमी : कित्येकजण गर्दीत असूनही संभाषणापासून दूर राहतात. हळू हळू छाेट्या संभाषणाचा व लाेकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करायला हवा.
 
 छाेट्या पावलांनी सुरुवात करा : एखाद्याशी थाेडावेळ बाेलून, प्रश्न विचारून वा स्तुती केल्यामुळे लाेकांशी बाेलण्याची भीती कमी हाेऊ शकते आणि आत्मविश्वास वाढू लागताे.
 
 राेल-प्लेची मदत घ्या : एखाद्या विश्वासू मित्र वा कुटुंबातील सदस्यासाेबत दरराेज चर्चा करण्याची प्रॅ्निटस करा. साेशल एंग्झायटी कमी हाेईल.
 
 निगेटिव्ह विचाराला आव्हान द्या : बहुतेकजण आपल्या चुकांकडे तितके लक्ष देत नाहीत जेवढा आपण विचार करताे.
जेव्हा कधी मनात गरजेपेक्षा जास्त भीतीव वा निगेटिव्ह विचार येतील तेव्हा स्वत:ला विचारा की खराेखरच स्थिती एवढी खराब आहे का? अशाप्रकारे रियलिस्टिक विचार स्वीकारल्यामुळे भीती कमी हाेण्यास मदत मिळू शकते आणि हळू हळू आत्मविश्वासही वाढू शकताे.