त्याची संभावना तिरस्काराने समर्थ ‘क्षुल्लक’ अशी करतात. कारण खराेखरीच असा माणूस समाजाच्या खिजगणतीतही राहू शकत नाही.
त्याला काळवेळ आणि प्रसंग, प्रयत्न आणि अभ्यास, आर्जवी वागणे व मैत्री यांचे माेल कळत नाही. थाेड्नयात त्याला काहीच कळत नाही, असा ताे अभागी आणि कमनशिबी असताे.
भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी या दुर्गुणांचे असुर संपत्ती असे वर्णन केले आहे. पण, ते वर्णन मऊपणाचे आहे, तर दासबाेधातील श्रीसमर्थांचे कुविद्यालक्षणांचे वर्णन त्यांच्या स्वभावाप्रमाणे स्पष्ट, राेखठाेक आणि अगदी सामान्यातल्या सामान्यालाही कळावे असे खणखणीत आहे. या दुर्गुणांचे वर्णन केल्यानंतर या समासाच्या शेवटी श्रीसमर्थ सांगतात की अशा दुर्गुणांनी युक्त असा मनुष्य म्हणजे कुविद्येचे काेठार आहे हे श्राेत्यांनी ओळखावे.
ज्याला स्वत:चा उद्धार करून घ्यावयाचा आहे त्याने ही लक्षणे ऐकून त्यांचा विचारपूर्वक त्याग करावा हेच उचित व अपेक्षित आहे. त्यांचा विनाकारण गैर अभिमान धरणे व दाेषालाच गुण समजून चिकटून राहणे हे विहित म्हणजे याेग्य नाही हे सांगितल्यावाचूनही ते राहात नाहीत.
- प्रा. अरुण गाेडबाेले,
माे. 9822016299