मुंबई, 9 ऑगस्ट (आ.प्र.) :
यंदा 14 सप्टेंबरला गणरायाचे आगमन हाेत असून, बाप्पाच्या स्वागतासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सज्ज झाले आहे.
मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातील काेकणवासीयांसाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या गणेशाेत्सवानिमित्त एसटीने यंदा 7 ते 25 सप्टेंबर या कालावधीत 5220 जादा बसेस साेडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिवहनमंत्री तथा एसटीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
गणेशाेत्सवाच्या नियाेजनासंदर्भात एसटीच्या मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत सरनाईक बाेलत हाेते. नुकत्याच पार पडलेल्या आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटीने 5200 जादा बसेस उपलब्ध करून दिल्या हाेत्या. त्या सेवेला भाविक व प्रवाशांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
त्याच धर्तीवर गणेशाेत्सवासाठीही माेठ्या प्रमाणावर जादा बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या जादा बसचे आरक्षण र्पिीलश्रळल.
ाीीींलेीी.लेा या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून, प्रवाशांना बसस्थानकांवर तसेच चडठढउ ईीी ठशीर्शीींरींळेप या अधिकृत माेबाईल अॅपद्वारेही आरक्षण करता येणार आहे.
किमान 40 प्रवाशांच्या गटासाठी 10 ऑगस्टपासून गट आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गट आरक्षणात महिला व ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलत, तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के भाडे सवलत लागू राहणार आहे. गणेशाेत्सवानिमित्त 7 सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातील प्रमुख बसस्थानकांतून या जादा बसचे संचालन करण्यात येणार आहे.
गणेशाेत्सवाच्या काळात एसटीची वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी सर्व प्रमुख बसस्थानके आणि बसथांब्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहाेरात्र कार्यरत राहतील. तसेच, काेकणातील प्रमुख महामार्गांवर आवश्यक तेथे वाहनदुरुस्ती पथके तैनात करण्यात येणार असून, प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि अखंड सेवा देण्यासाठी सर्वताेपरी व्यवस्था करण्यात आली आहे.