ज्ञानेश्वरी

    10-Aug-2026
Total Views |

Dyaneshwar. 
तंव आथी जी अर्जुन म्हणेŸ। हें दैविकिया प्रसादाचें करणेंŸ।।
तरि काय अमृताचें आराेगणेंŸ। पुरे म्हणवेŸ।। 9.230
 
ह्यानंतर भजन करणाऱ्या आणखी काही लाेकांचे वर्णन गीतेच्या आधाराने ज्ञानेश्वर करीत आहेत. हे माझे भक्त मजवाचून दुसरी वस्तूच जाणत नाहीत. वस्त्रामध्ये एकच सूत सर्वत्र असते, त्याप्रमाणे ते मलाच सर्वत्र पाहतात. ब्रह्मदेवांपासून मशकापर्यंत सर्व माझीच रूपे आहेत, अशी त्यांची खात्री असते. हा माेठा, हा लहान, हा जिवंत, हा निर्जीव असा भेद न करता सर्व सृष्टीत परमात्माच भरून राहिलेला आहे असे समजून त्यासच हे भक्त वंदन करतात.
 
त्यांना आपल्या श्रेष्ठत्वाचे वा उत्तमत्वाचे भानही नसते. समाेरचे याेग्य आहे की अयाेग्य आहे, हेही ते ओळखत नाहीत. सर्वांना सारखाच नमस्कार करावा असे त्यांना वाटते.
 
हा त्यांचा नमस्कार कसा असताे? ते किती नम्र असतात हे मार्मिक दृष्टांत देऊन ज्ञानेश्वर समजावून सांगतात. उंच ठिकाणाहून खाली पडणारे पाणी जसे स्वभावत: सखल भागाकडे जाते, त्याप्रमाणे जाे दृष्टीस पडेल त्याला नमस्कार करावा असा या भक्तांचा स्वभावच बनताे. अनेक फळांनी लगडलेली झाडाची ांदी ज्याप्रमाणे जमिनीला टेकून असते, त्याप्रमाणे हे भक्त सर्वांच्या ठिकाणी लीन हाेऊन असतात.
 
निरहंकार व नम्रता हे त्यांचे वैभव असते. सर्व वस्तूंत माझे दर्शन झाल्यावर ते माझा जयजयकार करतात. सर्वत्र परमात्मा भरून राहिलेला आहे या भावनेने त्यांची मानापमानाची वृत्ती नाहीशी हाेते. अखंड ऐक्य पावून ते परमात्म्याची उपासना करतात.अर्जुना, माझी ही चाैथी श्रेष्ठ भक्ती आहे.
हे सर्व ऐकून अर्जुन म्हणाला, देवा, भक्तीचे माहात्म्य तुमच्यामुळे मला कळले, पण अमृताचे भाेजन कधी पुरे म्हणता येईल का?