अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवर सिडकोचा बुलडोझर

द्रोणागिरी, कामोठे परिसरातील अतिक्रमणे केली जमीनदोस्त

    10-Aug-2026
Total Views |
 
cidco
नवी मुंबई, 9 जुलै (आ.प्र.) :
नवी मुंबईतील सिडकाेच्या मालकीच्या भूखंडांवरील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविराेधात कारवाई तीव्र करण्यात आली असून, द्राेणागिरी, कामाेठे, तरघर ते उलवे प्रवेश पूल आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या परिसरात सिडकाेने सलग माेहीम राबवली. या कारवाईत पक्की बांधकामे, गॅरेज, ढाबा, दुकाने, स्टाॅलसह रस्ते आणि पदपथांवरील सुमारे 50 टपऱ्या हटवण्यात आल्या. अनधिकृत वाहनतळांवरही कारवाई करून अवजड वाहने भूखंडाबाहेर काढण्यात आली.
 
सिडकाेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने द्राेणागिरी नाेडमधील सेक्टर एकमध्ये कारवाई केली. तेथील सुमारे 70 चाैरस मीटर क्षेत्रफळाचे पक्के वीट बांधकाम, पत्र्याच्या शेडमधील गॅरेज आणि ट्रक पार्किंग हटवण्यात आले. सेक्टर 47 आणि 50 मधील रस्ते व पदपथांवरील 40 ते 50 कच्च्या- प्न्नया टपऱ्यांवर जेसीबीच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली. कामाेठे नाेडमध्येही माेठी कारवाई करण्यात आली.
 
सेक्टर 24 मधील भूखंड क्रमांक 16 लगतच्या जागेवर अनधिकृतपणे उभी करण्यात आलेली अवजड वाहने बाहेर काढण्यात आली. या भूखंडावरील एक गॅरेज आणि टायरचे दुकान पाडण्यात आले.
 
कामाेठेत सेक्टर 22 मधील भूखंड क्रमांक 39 आणि 39 ए वरील सहा अनधिकृत स्टाॅल हटवण्यात आले. सेक्टर 31 मध्ये सुमारे 500 चाैरस मीटर जागेत उभारण्यात आलेल्या अनधिकृत ढाब्यावरही सिडकाेने बुलडाेझर चालवला. तरघर ते उलवे प्रवेश पूल, तसेच तरघर रेल्वे स्थानकाजवळील आम्र मार्ग परिसरात अतिक्रमणविराेधी माेहीम राबवण्यात आली. या भागातील अतिक्रमणे सर्व्हिस राेड आणि नवी मुंबई विमानतळालगत असल्याने ती हटवण्यात आल्याचे सिडकाेकडून सांगण्यात आले.
 
सिडकाेची काेणतीही अधिकृत परवानगी न घेता, तसेच प्रचलित नियम आणि धाेरणांचे उल्लंघन करून ही बांधकामे उभारण्यात आली हाेती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आतापर्यंत अतिक्रमण विभागाने 11 हजार काेटी किमतीची जागा माेकळी करून सिडकाेच्या ताब्यात घेतली आहे.