चाणक्यनीती

    10-Aug-2026
Total Views |

Chankya 
वाच्यार्थ : माणसाचा स्वभाव फार साधा, सरळ असू नये. वनात जाऊन पाहावे सरळ वृक्ष कापून टाकले जातात आणि वाकडे-तिकडे (वृक्ष) मात्र उभे असतात.
 
भावार्थ : मनुष्य स्वभावावर चाण्नयांनी येथे भाष्य केले आहे.
 
1. अत्यंत सरळ स्वभाव ः साधी माणसं इतरांची कपटनीती ओळखू शकत नाहीत. स्वत: मनातील काहीही लपवित नाहीत आणि इतरांनाही ते आपल्यासारखंच सरळ समजतात. त्यांची फसवणूक हाेते. कावेबाज धूर्त लाेक त्यांचा दुबळा-भाेळा स्वभाव ओळखून त्यांच्याकडून पाहिजे ती कामे करून घेतात. त्यांना फसवितात, अगदी त्यांना ‘मूर्ख’ म्हणून त्यांचे हसेही करतात.