केस गळती राेखण्यासाठी साेपे घरगुती उपाय

    06-Jul-2026
Total Views |
 
 
hair
सामान्यतः दिवसाला 50 ते 100 केस गळणे ही सामान्य गाेष्ट आहे, परंतु त्यापेक्षा जास्त केस गळत असतील तर ती चिंतेची बाब आहे. यामागे वाढते वय, प्रदूषण, अति ताण, जास्त धूम्रपान, पाेषक तत्वांची कमतरता, हार्माेन्सचे असंतुलन, टाळूवरील संसर्ग (इन्फेक्शन), थायराॅईड आणि निमिया अशी अनेक कारणे असू शकतात.
 
केस गळती राेखण्याचे घरगुती उपाय कडुनिंबाची पाने : कडुनिंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने केस धुवावेत आणि 5 ते 10 मिनिटे टाळूला मसाज करावा. यामुळे टाळूतील रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे केस मजबूत हाेतात आणि गळणे थांबते. तसेच, हे टाळूवरील इन्फेक्शन राेखण्यासही मदत करते.
 
मेथी दाणे : मेथी दाण्यांमध्ये फाॅलिक सिड, प्रथिने (प्राेटीन), व्हिटॅमिन ए, सी आणि के मुबलक प्रमाणात असतात.त्यामुळे ते केस मजबूत करून गळती थांबवतात. मेथीचे दाणे रात्रभर पाण्यातभिजवून सकाळी त्यांची पेस्ट बनवावी आणि केसांना लावावी. त्यानंतर गरम पाण्यात टाॅवेल भिजवून ताे पिळून केसांना गुंडाळावा. अर्ध्या तासानंतर केस धुवावेत. हा उपाय महिन्यातून दाेनदा एक महिनाभर करावा.
 
कढीपत्ता : कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्ससाेबतच प्रथिने आणि बीटाकॅराेटीन असते. हे केसांना मजबूत बनवून गळती थांबवते. कढीपत्त्याची पेस्ट करून ती हेअर ऑईलमध्ये मिसळून गरम करावी. तेल थंड झाल्यावर त्याने टाळूला मसाज करावा. दाेन आठवडे हा उपाय नियमित करावा.
 
कांद्याचा रस : कांद्याची साल काढून त्याचे माेठे तुकडे करावेत. आता ते मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस काढावा.या रसात एक माेठा चमचा गुलाबपाणी आणि एक चमचा मध मिसळून टाळूवर मसाज करावा. अर्ध्या तासानंतर शॅम्पूने केस धुवावेत.