मनमिळावू माेकळा स्वभाव, बाेल्नया लाेकांपेक्षा लाजाळू व एकलकाेंड्या स्वभावाच्या लाेकांना हृदयविकार हाेण्याचा जास्त धाेका असल्याचा निष्कर्ष शिकागाे नाॅर्थ-वेस्टर्न विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी गेल्या 3 वर्षात 2000 लाेकांचे अध्ययन करून काढला आहे.या शास्त्रज्ञांनी पहिल्या टप्प्यात 40 ते 55 वयाेगटातील पुरुष समाजात किती मिसळतात, त्यांचा स्वभाव, वागण्याची पद्धत इत्यादींचा अभ्यास केला गंमत अशी की, या अभ्यासाचा निष्कर्ष जाहीर झाला यावेळी 2000 लाेकांपैकी 60 ट्नके लाेकांचा मृत्यू झाला. त्यानंतर शास्त्रज्ञांनी त्या लाेकांनी दिलेली प्रश्नांची उत्तरे व त्यांच्यामृत्यूची कारणे यांचे सखाेल अध्ययन केले असता, मनमाेकळ्या स्वभावाच्या लाेकांपेक्षा लाजाळू, एकलकाेंड्या लाेकांना हृदयविकार हाेण्याची जास्त श्नयता असल्याचे निष्पन्न झाले. पण, याची नेमकी कारणे शास्त्रज्ञांना अद्याप समजलेली नाहीत.