ताणतणावांचा केवळ शरीरावरच नव्हे तर नात्यांवरही परिणाम हाेताे. ताणचा तुमच्या एकंदरीत वाटचालीवर, प्रगतीवर परिणाम हाेताे. तणावापासून शंभर टक्के मुक्त राहणे शक्य आहे. त्यासाठी आपल्या वागण्यात आणि जीवनशैलीत काही बदल करावे लागतात. तणावमुक्त जगण्यातूनच आनंद आणि प्रसन्नता लाभते.
वागण्यात बदल करा: तुम्ही कसे वागता याचा तुम्ही कधी विचार करता का? सतत चिंता, काळजी, राग, मनातील खदखद यामुळे मनावर ताण येताे. हे सगळे टाळायचे असेल तर आपण कसे वागले पाहिजे आणि आपल्या वागण्यात काेणते बदल केले पाहिजे याचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. तुमच्या आजूबाजूच्या व्यक्ती कशा वागतात यापेक्षा आपण कसे वागताे हे महत्त्वाचे असते. कारण दुसऱ्याचे वागणे आपण बदलू शकत नाही पण, स्वतःमध्ये बदल करणे तुलनेत साेपे असते.आपले वागणे बदलले तर आपल्या मनावर येणाराताण कमी हाेऊ शकताे. एका टप्प्यावर तणावरहीत जगण्यासाठी कसे वागले पाहिजे याचा उलगडा आपल्याला अनुभवातून हाेत जाताे.
परिस्थिती आहे तशी स्वीकारा: आपल्या म नासारखे घडावे असे आपल्याला वाटत असते आणि तसे घडले नाही की, आपल्या मनावर ताण येताे. त्यामुळे जी परिस्थिती बदलणे आपल्या हातात नसते, आपल्या नियंत्रणात नसते ती परिस्थिती आपण मान्य केली पाहिजे.परिस्थिती आहे तशी स्वीकारली की, मग आपल्याला त्याचा त्रास हाेत नाही आणि मनावर ताणही येत नाही.
सकारात्मक विचार करा: ताणाचे प्रमुख कारण म्हणजे मनातील नकारात्मक भावना. आयुष्यात सकारात्मक विचार करण्यासाठी स्वतःची विचारपद्धती बदला. तुम्ही सकारात्मक विचार करू लागलात की, परिस्थिती कशीही असली तरी त्याकडे सकारात्मक पद्धतीने पाहण्याची सवय लागेल.
आवड शाेधा: वेळ नेहमी पुढे सरकत असताे. मग तुम्ही कशासाठी थांबला आहात? ज्या क्षणी तुमच्यामनावर ताण जाणवू लागेल तेव्हा विचार करा की, आपल्याला कशाची ओढ आहे? आयुष्यात आपल्याला काय करण्याची आवड आहे? जर तुम्हांला चित्रे काढण्याची आवड असेल तर ब्रश हाती घ्या. संगीताची आवड असेल तर संगीत ऐका, वाद्य वाजवा, वाद्य वाजवायला शिका. या गाेष्टींमुळे मनावरील ताण दूर हाेताे.मन शांत हाेते.