समईं यावा चुको नये । मागे उणे बोलों नये ।।१।।
विचार आणि कृती यांच्या शुद्धतेबराेबरच श्रीसमर्थांच्या शुद्धतेवरही भर आहे. एका काव्यात श्रीरामाची प्रार्थना करताना ते म्हणतात - काेमल वाणी दे रे राम। विमल करणी दे रे राम।। विमल म्हणजेच पुण्यमार्गाच्या आचाराबराेबर माणसाचे बाेलणेही शुद्ध, सात्त्विक व साैजन्याचे हवे असा त्यांचा कटाक्ष आहे आणि अनाेळखी माणसाच्या कृतीपूर्वीही त्याच्या बाेलण्यावरून आपण त्याची परीक्षा करीत असताे हे राेजच्या व्यवहारातील उदाहरण पाहिले तरी ताे किती रास्त आहे हे लक्षात येईल. आपल्यापैकी अनेकांच्या ताेंडात लहानपणापासून काही अपशब्द बसलेले असतात. काही काही गावात एखादी शिवी इतकी रूढ झालेली असते की ती शिवी आहे असे तेथील लाेकांना वाटतच नाही. मात्र परक्या माणसाने त्यांचे बाेलणे ऐकले की ताे मात्र भांबावून जाताे. म्हणून श्रीसमर्थ म्हणतात की, ताेंडात शिवी असू नये आणि दुसऱ्याची फजिती पाहून कधी हसू नये. एखाद्या थाेरामाेठ्या कुळशीलवंताचे एखादे न्यून बघून हसू नये. कारण अशी वेळ काेणावरही दुर्दैवाच्या दशावतारात येऊ शकते. तेव्हा आपल्या मनाचा माेठेपणा अबाधित ठेवून माैन पाळावे.
काही भल्या भल्या लाेकांना चांगली वस्तू दिसली की ती खिशात घालायचा माेह हाेताे. परदेशातील पंचतारांकित हाॅटेलात सहलीला जाणारे अनेक भारतीय आपल्या सवयीने भारताचे नाव खराब करीत असलेले आपल्या ऐकण्यात येते.