नवी दिल्ली, 30 जुलै (वि.प्र) :
बदलती जीवनशैली आणि उशिरा येणारे पालकत्व यांमुळे अधिकाधिक पुरुष तपासणीसाठी पुढे येत असल्याने, पुरुष वंध्यत्व हे भारतातील सहाय्यक प्रजनन उद्याेगासाठी एक प्रमुख वाढीचा घटक म्हणून उदयास येत आहे. त्यामुळे प्रजनन सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना निदान आणि उपचारांच्या सेवांचा विस्तार करण्यास प्राेत्साहन मिळत आहे.
भारतातील इन विट्राे फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) बाजारपेठ. तिचे मूल्य अंदाजे 14,000 काेटी रुपये आहे. तिच्या अंतर्गत 2000 हून अधिक क्लिनिक्स कार्यरत आहेत. ती विस्ताराच्या पुढील टप्प्यासाठी सज्ज हाेत असतानाच हा बदल दिसून येत आहे.
सध्या देशात दरवर्षी सुमारे 2 लाख ते 2.5 लाख आयव्हीएफ सायकल्स (प्रक्रिया) केल्या जातात.
2030 पर्यंत ही संख्या वाढून सुमारे 4 लाख हाेण्याचा अंदाज आहे. या वाढीमध्ये अशाच प्रकारच्या शहरांचा महत्त्वपूर्ण वाटा असेल. प्रमुख आयव्हीएफ साखळ्या आणि प्रजनन तज्ज्ञांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आता वंध्यत्वाच्या सुमारे 40-50% प्रकरणांमध्ये पुरुषांमधील घटक कारणीभूत ठरतात, मग ते स्वतंत्रपणे असाेत किंवा स्त्रियांच्या वंध्यत्वाबराेबर असाेत.
त्यांच्या मते, हे बदलती जीवनशैली आणि पुरुषांमध्ये प्रजननक्षमतेची तपासणी करून घेण्याची वाढलेली तयारी, या दाेन्ही गाेष्टी दर्शवते.
नाेव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी काेलकाताचे वैद्यकीय संचालक राेहित गुटगुटिया यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत त्यांच्या क्लिनिकमध्ये पुरुषांमधील वंध्यत्वाच्या प्रकरणांमध्ये सुमारे 25 ट्न्नयांनी वाढ झाली आहे.
सल्लामसलतीसाठी येणाऱ्यांमध्ये 30 ते 35 वयाेगटातील पुरुषांचे प्रमाण वाढत आहे. पूर्वी वंध्यत्वाच्या तपासणीसाठी येणाऱ्या दर चार जाेडप्यांपैकी एका बाबतीत पुरुषांशी संबंधित कारणे असल्याचे निष्पन्न हाेत असे. मात्र आज हे प्रमाण दर तीन जाेडप्यांमागे एकापर्यंत पाेहाेचले आहे. वाढलेली जागरूकता आणि शुक्राणूंची कमी संख्या, त्यांची मंद हालचाल व असामान्य आकारमान यांसारख्या समस्यांमध्ये झालेली प्रत्यक्ष वाढ ही याची प्रमुख कारणे आहेत, असे गाैडियम आयव्हीएफच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक मनिका खन्ना यांनी सांगितले. निदान आणि उपचारांसाठी पुढाकार घेणाऱ्या पुरुषांच्या संख्येत हाेत असलेल्या वाढीमुळे वैद्यकीय सल्ल्याच्या पद्धतींमध्ये बदल हाेत आहेत. तसेच इंट्रासायटाेप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन सारख्या प्रगत प्रक्रियांची मागणीही वाढत आहे. बंगळुरू येथील फाेर्टिस हाॅस्पिटलमधील रिप्राॅडक्टिव्ह मेडिसिन अँड सर्जरी विभागाच्या अतिरिक्त संचालिका मनीषा सिंग यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून वंध्यत्वाच्या तपासणीत प्रामुख्याने महिलांवरच लक्ष केंद्रित केले जात असे. मात्र आता हे चित्र बदलत आहे. कारण अधिकाधिक जाेडपी एकत्रितपणे तपासणी करून घेत आहेत. पुरुषही तपासणीसाठी पुढाकार घेत आहेत.
जीवनशैली आणि पर्यावरणीय घटकांचा यात सहभाग डाॅक्टरांच्या मते, पुरुषांमधील वंध्यत्वाचे प्रमाण वाढण्यामागे लठ्ठपणा, मधुमेह, धूम्रपान, सततचा तणाव, अपुरी झाेप आणि बैठी जीवनशैली ही कारणे आहेत. विशेषतः तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक आणि अनियमित कामाच्या वेळा असलेल्या इतरांच्या बाबतीत, कामाचा ताण हे देखील एक कारणीभूत घटक म्हणून समाेर येत आहे.
लॅपटाॅपचा वापर, घट्ट कपडे आणि दीर्घकाळ एका जागी बसून राहिल्यामुळे अंडकाेषांच्या भागात निर्माण हाेणाऱ्या उष्णतेचा अंडकाेषांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम हाेताे, असे मुंबईस्थित अक्सिजेन आयव्हीएफचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक गाैतम दफ्तरी यांनी सांगितले.
प्लास्टिक, कीटकनाशके, अन्न पॅकेजिंग आणि औद्याेगिक प्रदूषकांमध्ये आढळणाऱ्या अंतः स्रावी प्रणालीत अडथळा आणणाऱ्या रसायनांच्या संपर्काकडेही डाॅक्टरांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे शुक्राणू निर्मितीच्या संप्रेरकीय नियमनात अडथळा येऊ शकताे. स्नायूंच्या वाढीसाठी नाबाॅलिक स्टिराॅइड्सचा गैरवापर ही देखील एक महत्त्वाची चिंता म्हणून समाेर आली आहे.
कारण त्याचा शुक्राणू निर्मितीवर लक्षणीय परिणाम हाेऊ शकताे, असे नाेएडास्थित कैलाश आयव्हीएफच्या संचालिका रिनी शर्मा यांनी सांगितले.
महानगरांच्या पलीकडे बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई आणि दिल्ली-एनसीआर ही माेठी बाजारपेठ असली, तरी टायर-2 आणि टायर-3 शहरांमध्येही वंध्यत्व निवारण सेवांबाबतच्या सल्लामसलतींचे प्रमाण वेगाने वाढत आहे. याचे कारण म्हणजे यासंदर्भातील वाढती जागरूकता आणि प्रगत सेवांची वाढलेली उपलब्धता.
आम्हाला टायर-2 (दुसऱ्या श्रेणीतील) शहरांमध्ये पुरुषांच्या प्रजननक्षमतेशी संबंधित समस्यांची प्रकरणे माेठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. त्यांचे प्रमाण सुमारे 45 टक्के इतके आहे.
गुटगुटिया यांनी सांगितले की, महानगरांव्यतिरिक्त वाराणसी, गाेरखपूर आणि भाेपाळ यांसारख्या उत्तर आणि मध्य भारतातील शहरांमध्येही याचे प्रमाण अधिक असल्याचे आमच्या निरीक्षणातून दिसून आले आहे.