पाणी कमी हाेऊ देऊ नये : दिवसभर पाणी पित राहा.
विशेषकरून शारीरिक हालचालींपूर्वी वर्कआउट करताना व नंतर पाणी अवश्य प्या.
ऊर्जा मिळवा : आपल्या जेवणात पुरेशा प्रमाणात फळे, भाज्या व धान्यांचा समावेश करा.
स्वत:ला जास्त थकवू नका : हालचाली सहजतेने करा व त्यात दक्षता बाळगा.
फ्रेश राहा : टवटवीत राहण्यासाठी जेवण, व्यायाम, ध्यान इ.त ताळमेळ ठेवा.
दीर्घश्वास घ्या : नाकाने दीर्घश्वास घ्या आणि ताेंडाने उत्तम प्रकारे श्वास साेडा.
ऊर्जेसाठी खा : दिवसभर सॅच्युरेटेड फॅट व प्राेटीनचे पदार्थ खाणे टाळा व हेल्दी जेवण करा.
वेळेचे भान ठेवा : जेवण, व्यायाम आणि झाेपण्यासाठी वेळ ठरवा आणि त्या वेळेची सवय लावून घ्या.
पुन्हा ऊर्जा मिळवा : प्राेटीन आणि कार्बने भरपूर जेवणानंतर पुरेशा प्रमाणात पाणी प्या. यामुळे आपण तत्काळ ऊर्जा मिळवू शकाल.