२० सेकंदांच्या मिठीने ताण कमी होतो

    31-Jul-2026
Total Views |
 
Arogya
मुलांना चांगली शाळा, पाैष्टिक आहार आणि चांगल्या सुविधा देणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्यांना प्रेमाचा स्पर्श देणेही गरजेचे आहे. मुलाला राेज एक मिठी देण्याची सवय त्याचा आत्मविश्वास, भावनिक सुरक्षा आणि आई-वडिलां साेबतचे नाते अधिक मजबूत बनवू शकते. असे तर आपण आता जाणताेच. मात्र, प्रेमाचे आलिंगन पालकांसाठी देखील जादुई ठरू शकते, हे समजून घेणे आवश्यक आहे. अनेक अभ्यासांमध्ये म्हटले आहे की, जवळच्या व्यक्तीचे 20 सेकंदांचे उबदार आलिंगन व्यक्तीच्या शरीरात ऑक्सिटाेसिन नावाच्या प्रेमाच्या रसायनांचा झरा निर्माण करते आणि तणामुळे निर्माण हाेणारे काॅर्टिसाेल हार्माेन्स नाहीसे हाेतात. अर्थात, थाेड्या वेळासाठीच का असेना पण त्या थाेड्या वेळात व्यक्ती रिलॅक्स हाेते आणि त्याचा दीर्घकाळ प्रभाव राहताे.
 
काही काळापूर्वीच ब्रिटिश राजघराण्याचे ड्युक ऑफ ससेक्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रिन्स हॅरी यांनीही आपल्या आयुष्यात मुलांच्या प्रेमळ मिठीचे किती महत्त्व आहे याविषयी बाेलले हाेते. त्यांनी म्हटले हाेते की, जेव्हा कधी कठीण किंवा थकवणारा दिवस असताे, तेव्हा ते आपल्या मुलांकडे प्रिन्स आर्ची आणि प्रिन्सेस लिलिबेस्ट यांना एक्स्ट्रा, एक्स्ट्रा टाईट हग्स देतात. ही सवय त्यांना त्यांच्या दिवंगत आई प्रिन्सेस डायना यांच्याकडून मिळाली हाेती. डायना हॅरी आणि त्यांचे भाऊ प्रिन्स विल्यम यांनाही अशाच प्रकारे शक्य तितक्या जाेरात मिठी मारत असत. मुलाला मिठी मारल्याने त्याच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर कसा परिणाम हाेताे? घरात प्रेम आणि भावना व्यक्त करण्याची ही सवय पुढच्या पिढीला अधिक संवेदनशील आणि मजबूत कशी बनवते? आई-वडील स्वतः जेव्हा तणावात असतात तेव्हा मुलासाेबतचे हे फिजिकल कनेक्शन त्यांना मानसिक शांतता कशी देते? आज आपण हे सायकाेलाॅजिस्ट अमृता आचरेकर यांच्याकडून जाणून घेऊया.
 
मिठी मारण्याचे महत्त्व
आई-वडील जेव्हा मुलाला मिठी मारतात, तेव्हा स्किन-टू-स्किन टच आई- वडील आणि मूल दाेघांनाही एका सुरक्षित वातावरणाचा अनुभव करून देताे, कारण त्वचेचे रिसेप्टर्स मेंदूला सिग्नल पाठवतात की ही एक सेफ स्पेस आहे.
या स्पर्शाने शरीरातून अशी रसायने आणि हार्माेन्स मुक्त हाेतात जे मुलाच्या भावना नियंत्रित करण्यास मदत करतात.
मेंदूतून ऑक्सिटाेसिन नावाचे हार्माेन रिलीज हाेते जे केवळ लव्ह हार्माेन नाही, तर ते आई-वडील आणि मूल यांच्यातील नाते अधिक मजबूत करते, अटॅचमेंट आणि विश्वास वाढवते तथापि दाेघांना असा अनुभव करून देते की मी तुझ्यासाेबत आहे.
याशिवाय हे शरीराच्या पॅरासिम्पाथेटिक मज्जासंस्थेला (नर्व्हस सिस्टम) सक्रिय करते, ज्यामुळे काॅर्टिसाेल म्हणजेच तणाव हार्माे न कमी हाेताे आणि हृदयाचे ठाेके देखील सामान्य लयीवर येतात. अशा प्रकारे हा स्पर्श नैसर्गिकरित्याच एक इमाेशनल रेग्युलेटर म्हणून काम करताे. मात्र, हे सर्व सकारात्मक परिणाम तेव्हाच हाेतात जेव्हा हा स्पर्श आई-वडील किंवा प्रेमळ व्यक्तीकडून मिळत असेल. जर एखादी परकी व्यक्ती मुलाला मिठी मारत असेल तर प्रक्रिया उलटी हाेते.
मूल असुरक्षितता अनुभवते, ते त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते आणि जर परकी व्यक्ती त्याला साेडत नसेल तर त्यात तणाव हार्माेन्स वाढतात आणि मुलाला वाटते की त्याच्या भावनिक सीमांचे हनन हाेत आहे.
अशा प्रकारे आई-वडिलांद्वारे मुलाला मिठी मारल्याने मुलाच्या शारीरिक व मानसिक विकासाची गती अतिशय संतुलित आणि स्थिर राहत