दोन लाख पगार तरी आनंदी नाही : बंगळच्या तरुणाची अजब तक्रार

    31-Jul-2026
Total Views |
 
Bengluru
बेंगळुरू, 30 जुलै (वि.प्र.) :
महिन्याला दाेन लाख रुपये पगार आणि डाेक्यावर काेणतंही कर्ज नसतानाही 26 वर्षीय तरुणाला आपण ‘गरीब’ आहाेत असे वाटते. बेंगळुरू येथील आयटी कंपनीत रुजू असलेल्या या तरुणाने खुद्द ठशवळीींं या साेशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर आपल्या भावना व्यक्त केल्या. साेशल मीडिया पाेस्टमध्ये हा तरुण म्हणताे की, मी अत्यंत सामान्य कुटुंबातून आलाे आहे. वयाच्या 21 व्या वर्षी पहिली नाेकरी मिळाली, ताेपर्यंत कुटुंबाचे उत्पन्न फक्त 6000 ते 7000 रुपये हाेते आणि संपूर्ण कुटुंब 10 बाय 100 फुटाच्या एका लहान खाेलीत राहत हाेते.
 
नाेकरीला लागल्यावर पैसे कमावल्यावर आपल्या पालकांना चांगली लाइफस्टाइल देण्याचे त्याचे प्राधान्य हाेते.
आई-वडिलांनी काम करणे थांबवावे, असं त्याला वाटायचं. त्यात यशस्वी झाला आणि आज त्याचे आई-वडील मूळ गावी एका 2 बीएचके फ्लॅटमध्ये निवृत्तीचे जीवन जगत आहेत, तर स्वतः बेंगळुरूमध्ये एका 2 बीएचके फ्लॅटमध्ये राहताे. तरीही, आनंदी नाही. आपल्या दर महिन्याच्या खर्च आणि गुंतवणुकीची माहिती देताना त्या तरुणाने सांगितले की, मी आपल्या उत्पन्नाचा माेठा भाव गुंतवताे दर महिन्याला म्युच्युअल फंडात 30000 रुपये, मुदत ठेवींमध्ये आणि साेन्याच्या चिट्समध्ये 10000 गुंतवताे. याव्यतिरिक्त आपल्या आई-वडिलांना 15000 रुपये ते 20000 रुपये पाठवताे व स्वतःचे घर भाडे व इतर खर्च मिळून अंदाजे 25000 रुपये खर्च करताे.
 
या तरुणाच्या पाेर्टफाेलिओत 4 लाखांचे शेअर्स, 2 लाख रुपयांची एफडी, 2 ते 2.5 लाखांचे साेने आणि सॅलरी खात्यात 6 लाख रुपये आहेत. तसेच आपल्या कुटुंबाच्या सुविधेसाठी 60,000 रुपयाची स्कूटर, 70,000 रुपयांचा मॅकबुक आणि 25 हजाराचा फाेनही घेतला आहे. यासाेबत पालकांसाठी 30000 रुपये स्वतःसाठी 24000 रुपयांचा विमादेखील काढला आहे.
असं असूनही या तरुणाला आपल्या भविष्याची चिंता सतावत आहे.
यावर्षी लग्नावर किमान 10 लाख रुपये खर्च, 30 ते 40 लाख रुपयांची गाडी, 1 काेटी ते दीड काेटी रुपयांचा भूखंड खरेदी करायचा आहे आणि 20 लाखांची बाईक घेण्याचाही विचार असल्याचे तरुणाने म्हटले.
त्याने म्हटले की त्याच्याकडे बचत आहे, पण एकाच वेळी सगळं परवडत नाही, त्यामुळे प्रत्येक निर्णयावर तडजाेड करावी लागत आहे.
 
पाेस्टमध्ये तरुणाने पुढे म्हटले की, मी गावाे जाताे आणि मजूर म्हणून किंवा ऑटाे-रिक्षा चालवणाऱ्या आपल्या मित्रांना पाहताे, तेव्हा माझी ही भावना अधिकच तीव्र हाेते. ते कमी पैशात आनंदी आणि समाधानी दिसतात, पण केवळ अतिरिक्त 1000 रुपये मिळाल्यावर स्वतःला श्रीमंत समजतात.
अनेक मित्रांनी आपल्या आवडत्या वस्तू खरेदी करण्यासाठी कर्ज काढायला मागेपुढे पाहिले नाही, तर त्याने मात्र नेहमीच कर्ज टाळले.
या ‘गरिबी मानसिकतेचा’ दैनंदिन निर्णयांवरही परिणाम हाेताे. अशा परिस्थितीत, तणावमुक्त जीवन जगण्यासाठी सगळं करूनही 750 रुपयेपेक्षा जास्त किमतीचा शर्ट खरेदी करतानाही आपल्याला दडपण येतं.
बेंगळुरूमध्ये मित्रांसाेबत बाहेर जाऊन, पार्ट्या करून आणि सहलीला जाऊनही, त्याला समाधानही वाटत नाही आणि श्रीमंतही वाटत नाही.