बेरोजगार मुलांच्या पालकांना नैराश्य येण्याची शक्यता १२ टक्क्यांनी जास्त

    30-Jul-2026
Total Views |

unemployment 
भारतात केलेल्या एका माेठ्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, ज्या ज्येष्ठ नागरिकांची प्राैढ मुले बेराेजगार आहेत, त्यांना इतरांपेक्षा नैराश्याचा धाेका 12 ट्न्नयांनी जास्त असताे.
कुटुंबाच्या आर्थिक आणि सामाजिक रचनेतंर्गत असलेल्या दबावांवरही हे संशाेधन प्रकाश टाकते. या दबावाचा थेट परिणाम वृद्धांच्या मानसिक आराेग्यावर हाेताे. ‘साेशल सायन्स अँड मेडिसिन’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात हे स्पष्ट झाले आहे.
 वृद्धांच्या आनंदात मुलांचा राेजगार हा एक महत्त्वाचा घटक या अहवालातील निष्कर्ष कुटुंब आणि मानसिक आराेग्य यांच्यातील घनिष्ठ संबंधावर प्रकाश टाकतात. यानुसार, जेव्हा कुटुंबाला आधार देणारे मूल बेराेजगार असते, तेव्हा चिंता केवळ तरुणांपुरती मर्यादित राहत नाही. स्वीडनमधील उमेआ विद्यापीठातील संशाेधकांना असे आढळले आहे की, भारतातील वृद्धांच्या आनंदात मुलांचा राेजगार हा एक महत्त्वाचा घटक आहे. विद्यापीठाच्या ‘डेमाेग्राफिक अँड लाइफ रिसर्च सेंटर’मधील संशाेधक त्यागी यांनी सांगितले की, जेव्हा वृद्धांची मुले बेराेजगार हाेतात, तेव्हा पालकांमध्ये नैराश्याचा धाेका 3.14 टक्क्यांनी वाढताे.
 
मुलींपेक्षा मुलांकडून जास्त अपेक्षा मुलांच्या बेराेजगारीमुळे पालकांमध्ये नैराश्याचा धाेका मुलींच्या बेराेजगारीपेक्षा जास्त वाढताे, असे संशाेधकांना आढळले.
त्यागी यांच्या मते, या निकालांवरून असे दिसून येते की, भारतातील कुटुंबांवर परंपरांचा अजूनही खाेलवर परिणाम हाेताे. मुलांनी विशेषतः थाेरल्या मुलाने वृद्धापकाळात पालकांना आधार द्यावा अशी अपेक्षा असते.
याचा अर्थ असा की, जर मुलगा बेराेजगार राहिला, तर त्याचा पालकांच्या मानसिक आराेग्यावर गंभीर परिणाम हाेताे.
सामाजिक सक्रियतेने मिळते सुरक्षितता बेराेजगार मुलांच्या पालकांमध्ये समाजापासून दूर राहण्याची प्रवृत्ती दिसते. हा एकटेपणा त्यांना नैराश्याकडे ढकलताे, असेही या संशाेधनात दिसले. याउलट, जे ज्येष्ठ नागरिक सामाजिकदृष्ट्या सक्रिय राहतात त्यांची स्थिती खूपच चांगली असते.
संशाेधनात असे म्हटले आहे की, सामाजिक सक्रियता आणि समाजात मिसळणे हे ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षात्मक उपायाप्रमाणे काम करते.
 
भारतीय वृद्ध समस्या सुटण्यासाठी युवांवर अवलंबून भारतात, तरुण लाेक अजूनही त्यांच्या आई-वडिलांची आणि आजीआजाेबांची काळजी घेतात. भारतीय वृद्धांना आर्थिक आणि आराेग्याच्या समस्यांना सामाेरे जावे लागते. या समस्या सुटण्यासाठी ते घरातील युवांवर अवलंबून असतात. जर तरुण पिढीला राेजगार मिळवता आला नाही, तर ज्येष्ठांना असुरक्षित वाटते. वृद्धापकाळात युवांनी आपल्याला आधार द्यावा अशी त्यांची अपेक्षा असते.
 या संशाेधना दरम्यान, 73,000 पेक्षा जास्त लाेकांचा अभ्यास करण्यात आला.
 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 18 टक्के ज्येष्ठ नागरिकांचा विमा हाेता.
 तरुण बेराेजगार असल्यामुळे 12 ट्न्नयांनी धाेका वाढताे.
 या अभ्यासात 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पालकांचा समावेश करण्यात आला हाेता.