चाणक्यनीती

    30-Jul-2026
Total Views |
chanakya 
 
वाच्यार्थ : भाेजनाने ब्राह्मण (पुराेहित), आकाशातील कृष्णमेघांच्या गडगडाटाने मयूर, इतरांचे सुख पाहून सत्पुरुष तर इतरांना दु:खात पाहून दुष्ट लाेक खूश हाेतात.

भावार्थ : प्रत्येकाचा आनंद त्याच्या स्वभावात दडलेला असताे.

1. ब्राह्मण ः पाैराेहित्य करणारा ब्राह्मणाच्या उपजीविकेचे साधनच मुळी त्याची पूजा-पाठ हे असते. उपवास करून ताे यजमानाकडे पूजाविधी संपन्न करताे. त्यानंतर स्वाभाविकच भाेजन-दक्षिणादी गाेष्टींची त्याला अपेक्षा असते. अशावेळी सुग्रास अन्न खावयास मिळाल्यास ताे तृप्त हाेऊन यजमानाला मनापासून आशीर्वाद देताे.