स्त्रियांचा स्वभाव इतका गुंतागुंतीचा का असताे?

    03-Jul-2026
Total Views |
 

women 
स्त्रियांचा स्वभाव हा अत्यंत व्यापक, भावनिक आणि बहुआयामी असताे.प्रेमळ, सहनशील, त्यागी, आणि घर सांभाळणारी अशी तिची प्रतिमा असली तरी, आजच्या युगात ती आत्मनिर्भर, धाडसी आणि निर्णयक्षम देखील आहे.स्त्री स्वभावात माया, ममता, चिकाटी, आणि संकटांशी लढण्याची ताकद असते, ज्यामुळे ती कुटुंबाचा भक्कम आधारस्तंभ ठरते. स्त्रिया सहसा भावनिकदृष्ट्या अधिक प्रगल्भ असतात, तसेच कुटुंबासाठी त्याग करण्याची आणि कठीण परिस्थितीत संयम राखण्याची त्यांची क्षमता अफाट असते.
आपल्या कुटुंबाची प्रियजनांची काळजी घेणे, घरातील सर्वांच्या गरजा पूर्ण करणे आणि घर आनंदी ठेवणे हे त्यांचे नैसर्गिकवैशिष्ट्य आहे. अनेक स्त्रिया, विशेषतः गृहिणी, आर्थिकदृष्ट्या हुशार असतात आणि संकटाच्या काळी काटकसरीने घराचा गाडा चालवतात. हे झाले त्यांचे गुण. त्याचबराेबर त्यांच्या स्वभावात अनेकदा भावनिक गुंतागुंत पाहायला मिळते. त्यामागील कारणे.
 
त्या हृदयापासून विचार करतात ः स्त्रिया नेहमी हृदयापासून विचार करतात.त्यांच्या विचारांमध्ये मायेचा ओलावा, आपुलकी, काळजी असते. त्याउलट पुरुष मात्र मेंदूच्या विचारानुसार वागतात.
त्यामुळे अनेकदा त्यांच्या वागण्यात काेरडेपणा असताे. स्त्रिया हृदयापासून विचार करत असल्याने त्या लवकर भावनिक हाेतात. भावनिक हाेण्यामुळे त्यांचे वागणे जास्त गुंतागुंतीचे असते.
 
स्त्रिया नेहमी तुलना करतात ः त्यांची किंवा त्यांच्या नवऱ्याची त्या नेहमी तुलना करतात आणि त्यावरून निर्णय घेतात.त्यामुळे त्यांच्या राेजच्या वागण्याबाेलण्यात अनेकदा सरमिसळ झाल्याचे जाणावते.
 
त्या एकाचवेळी अनेक कामे करत असतात ः स्त्रिया एकाचवेळी घरातील आणि व्यावसायिक पातळीवरील जबाबदाऱ्या पार पाडत असतात. एकाचवेळी अनेक ठिकाणची कामे त्या हाताळत असतात.राहताे. त्यातून त्यांचे वागणे अधिक गुंतागुंतीचे वाटू लागते. त्याउलट पुरुषांच्या मनात भूतकाळातील घटनांचा वर्तमानात ारसा संघर्ष नसताे.
 
महिला स्वतःबाबत टाेकाच्या टीकाकार असतात ः विश्वास ठेवा अगर ठेवू नका स्त्रिया स्वतःबाबत अतिशय कठाेर टीकाकार असतात. त्या स्वतःशी कठाेरपणे वागतात. अगदी आपण कसे दिसताे यापासून ते भावनिक उद्रेकापर्यंत. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व समजणे अवघड बनते.