ब्रँडेड औषधांसाठी डाॅ्नटरांच्या मार्केटिंगवर खूप खर्च हाेता
संध्यानंद.काॅम नेहमी आपल्या मनात ही भीती असते की, जी औषधे जवळच्या मेडिकल स्टाेअरमध्ये 140 रुपयांना मिळत आहेत, ती सरकारी जन औषधी केंद्रावर फ्नत 10 रुपयांत कशी मिळू शकतात? स्वस्त औषधांची ्नवालिटी खराब तर नाही? हाच संशय दूर करण्यासाठी देशात प्रथमच नागरिकांनी पैसे जमवून वैज्ञानिक तपास केला आहे.
तपासात काय समजले? जेनेरिक औषधे स्वस्त का आहेत? केरळमधील स्वतंत्र संस्था ‘मेश’ने 22 गंभीर आजारांवरील 131 औषधांची सँपल्स बाजारातून घेऊन त्यांची नॅशनल लॅबमध्ये टेस्ट केली. त्याच्या परिणामात जेनेरिक औषधे सर्वात महाग ब्रँडेड औषधांच्या बराेबरीची (99.55% शुद्धता) आढळून आली. ब्रँडेड कंपन्या रिसर्च, जाहिराती आणि डाॅ्नटरांच्या मध्ये मार्केटिंगवर काेट्यवधी रुपये खर्च करून किंमत वाढवितात.
अॅप, ्नयूआरकाेडमधून औषधातील मुख्य घटक कसे ओळखावेत? जन औषधी सुगम अॅप : या अॅपवर ‘सर्च मेडिसिन’ मध्ये जाऊन ब्रँडेड औषधाचे नाव टाइप करा. अॅप त्वरित औषधातील मुख्य घटक, किंमत व त्याची उपलब्धता दाखवेल.
्नयूआर काेड स्कॅनिंग : औषधांच्या मागे असलेल्या ्नयूआर काेडला माेबाइलने स्कॅन करा. त्यामुळे औषधाचा खरा फाॅर्म्युला आणि मुख्य घटक स्क्रीनवर येतील.
डाॅ्नटर जेनेरिक नावे लिहून देत नसतील, तर काय करावे? नियमानुसार प्रत्येक डाॅ्नटरांनी कागदावर औषधाचे जेनेरिक नाव स्पष्ट अक्षरांत लिहिणे आवश्यक आहे. जर डाॅ्नटर टाळाटाळ करीत असतील, तर पेशंट हाॅस्पिटल किंवा मेडिकल काउंसिलमध्ये ऑनलाइन तक्रार दाखल करू शकतात. मेडिकल स्टाेअरमधून ब्रँडेड औषधांचा जेनेरिक पर्याय मागू शकतात.
जेनेरिक औषधांचा खरेपणा कसा ओळखावा? औषधांच्या पॅकिंगवर छापलेल्या ्नयूआर काेड किंवा बारकाेडला माेबाइलने स्कॅन करा.
ज्यामुळे केंद्रीय ड्रग डेटाबेस एपीआयवर त्याची खरी माहिती दिसून येते. औषधे जनऔषधी केंद्र किंवा नाेंदणीकृत फार्मासिस्टकडूनच खरेदी करा. देशभरात आता 19,000 पेक्षा जास्त जनऔषधी केंद्र आहेत.