काेणाचे उपकार शक्यताे घेऊ नयेत आणि घ्यावे लागलेच तर येणाऱ्या पहिल्या संधीलाच त्याची कृतज्ञतेने परतेड करावी. आपली राहणी स्वच्छ, पाेशाख नीटनेटका आणि वागणूक सदैव साैजन्यपूर्ण असावी. आपल्या विचारामध्ये व्यापकपणा असावा. काेणी निघाला तर त्याला काेठे निघालात असे विचारू नये म्हणजेच ज्याच्याशी आपला संबंध नाही अशा चाैकशी करू नये. शक्यताे परस्वाधीनपणा येऊ देऊ नये आणि काेणावरही अवलंबून न राहता स्वत:ची कामे स्वत:च करण्याची जाणती सवय लावून घ्यावी.अनेकदा साधे रिक्षाने गेलाे तर आपण टेरिफप्रमाणे 10 रु. झाले कां 11 रु. अशी हुज्जत घालत बसताे.
दुसऱ्याला त्रास देताे आणि स्वत:लाही. 1 रुपयासाठी 100 रुपयांचा मनस्ताप करून रक्तदाब विनाकारण वाढवून घेताे. अशासाठी श्रीसमर्थ म्हणतात की विनाकारण हुज्जत घालू नये आणि साक्षीपुरावा असल्याशिवाय काेर्टकचेरी करू नये. पापमार्गाने संपत्ती मिळवू नये आणि नेहमी पुण्यमार्गानेच चालावे. दुसऱ्याचा द्वेष, मत्सर आणि निंदा करू नये आणि आपल्या शक्तीच्या बळावर परद्रव्य आणि परस्त्री यांचे हरण करू नये. चहाडी, कुचाळकी, आळस, वाईट संगत, धूम्रपान, अनीतिमान लाेकांशी मैत्री टाळावी. शरीरसुखाच्या लाेभाने प्रयत्न आणि कष्ट करण्याचा कंटाळा करता कामा नये. आपले स्वत:चेच गुणवर्णन स्वत: करू नये आणि विनाेद सांगताना स्वत:च हसू नये असे सांगणाऱ्या श्रीसमर्थांनी मनुष्यस्वभावाचा किती बारीक अभ्यास केला आहे हे जाणवत राहते.
काेणाचेही अगदी वडिलांचे मिंधेपण असू नये हे सांगताना ते म्हणतात,
आसुदे अन्न खाऊ नये । वडिलांचेहि ।
। श्री समर्थांची स्वकर्तृत्त्वाची, कष्टाची आणि परमप्रयत्नांची ही शिकवण अगदी अंगी बाणवावी अशीच आहे!
- प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299