डायबिटिस आणि लठ्ठपणावर मात करण्यास एक इंजे्नशन उपयु्नत

    28-Jul-2026
Total Views |
 
Diabetes
वजन कमी झाल्याने इन्शुलिन अधिक चांगल्या प्रकारे काम करते आणि ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. विविध देशांच्या आराेग्य एजंसींची मंजुरी मिळाल्यानंतरच हे औषध उपलब्ध हाेऊ शकेल...
 
संध्यानंद.काॅम जगभरातील डायबिटीस व लठ्ठपणाशी झगडत असलेल्या लाेकांसाठी नवीन आशा दिसून आली आहे. हे नवीन औषध रेटाट्रूटाइड आहे, जे इंजे्नशनच्या रूपाने दिले जाऊ शकते. या नवीन औषधाविषयी काेणते दावे केले जात आहेत? रेटाट्रूटाइड काय आहे? ते कसे काम करते? मेडिकल जर्नल ‘द लँसेंट’ मध्ये प्रकाशित स्टडीनुसार रेटाट्रूटाइड एक नवीन इंजे्नशनने देण्यासारखे औषध आहे, जे शरीरात तीन वेगवेगळी हार्माेन (जीएलपी-1, जीआयपी आणि ग्लूकागाॅन) यांच्या प्रमाणे काम करते.त्यामुळे भूक कमी लागते.

शरीर जास्त ऊर्जा खर्च करते आणि ब्लड शुगर नियंत्रित राहते. आठवड्यात एकदा घेतले जाणारे हे इंजे्नशन ब्लड शुगर नियंत्रित करण्याबराेबरच वजन कमी करण्यातही प्रभावी सिद्ध झाले आहे. याला लठ्ठपणा आणि टाइप-2 डायबिटिसच्या इलाजात संभाव्यपणे परिस्थिती बदलून टाकणारे मानले जात आहे. 
 
ट्रायलमध्ये काय परिणाम समाेर आले? टाइप-2 डायबिटीस पेशंटवर केल्या गेलेल्या 40 आठवड्यांच्या संशाेधनात आढळले की, प्रत्येक आठवड्याला एक इंजे्नशन घेतल्यानंतर वजन सरासरी 11.5% ते 15.3% पर्यंत कमी झाले. त्याबराेबरच त्यांच्या ब्लड शुगरच्या स्तरातही सुधारणा दिसून आली.

लठ्ठपणाबराेबर डायबिटिसचा काय संबंध आहे? तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जास्त वजन किंवा लठ्ठपणा टाइप-2 डायबिटिसचा सर्वांत माेठा धाेकादायक कारक आहे. वजन कमी झाल्याने इन्शुलिन अधिक चांगल्या प्रकारे काम करते आणि ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.

हे औषध आता बाजारात उपलब्ध आहे? अजून हे औषध परीक्षण आणि नियामक मान्यतेच्या प्रक्रियेत आहे. विविध देशांच्या आराेग्य एजंसींची मंजुरी मिळाल्यानंतरच ते उपलब्ध हाेऊ शकेल.

याचे दुष्परिणामसुद्धा आहेत का? संशाेधनाच्या दरम्यान काही लाेकांमध्ये च्नकर येणे, जुलाब, मळमळ आणि उलटी असे दुष्परिणाम समाेर आले. तथापि बहुतांश प्रकरणांमध्ये त्यांना हल्के किंवा मध्यम श्रेणीचे मानले गेले. तसेच गंभीर दुष्परिणाम अपक्षेपेक्षा कमी दिसून आले.