तज्ज्ञांच्या अनुसार राेबाेट नाेकऱ्या नष्ट करणार नाहीत, तर नाेकऱ्यांचे स्वरूप बदलतील. राेबाेट ऑपरेटर आणि राेबाेट मेंटेनन्स इंजिनीअर अशा नवीन नाेकऱ्या निर्माण हाेऊ शकतात...
संध्यानंद.काॅम चीनमधील एकाच कंपनीच्या सुमारे 7 लाख डिलिव्हरी कर्मचाऱ्यांची जागा राेबाेट घेऊ शकतात. ई-काॅमर्स कंपनी जेडी.काॅमचे संस्थापक रिचर्ड लियू यांनी एपीईसी चायना सीईओ फाेरममध्ये म्हटले की, भविष्यात डिलिव्हरी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असणार नाही. सर्व डिलिव्हरी राेबाेटद्वारे केली जाईल. कंपनीच्या सुमारे 7 लाख डिलिव्हरी आणि फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांवर या बदलाचा परिणाम हाेऊ शकताे.
जेडी.काॅम आधीपासूनच आपले वेअरहाऊस, साॅर्टिंग सेंटर आणि लाॅजिस्ट्निस नेटवर्कमध्ये माेठ्या प्रमाणात ऑटाेमेशनचा उपयाेग करत आहे. रिचर्ड लियू यांनी सांगितले की, त्यांच्या कंपनीने एआय आणि राेबाेट्निसमुळे प्रभावित हाेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक सेवानिवृत्ती याेजना सुरू केली आहे. त्यानुसार चीनच्या सुमारे 120 शिक्षण संस्थांच्या मदतीने कर्मचाऱ्यांना राेबाेटची दुरुस्ती, देखभाल आणि त्यांचे टे्ननाॅलाॅजी ऑपरेशन अशी काैशल्ये शिकविली जातील.
100 पेक्षा जास्त कामे राेबाेटकडून करून घेण्याचा प्रयत्न चीनचा प्रयत्न आहे की, या वर्षीच्या शेवटपर्यंत ह्यूमनाॅइड राेबाेट 100 पेक्षा जास्त प्रकारची प्रत्यक्ष जीवनातील कामे करण्यासाठी सक्रिय हाेतील. चीनच्या उद्याेग मंत्रालयाने सरकारी उद्याेगांना आदेश दिले आहेत की, त्यांनी राेबाेट्सना ‘वर्क माेड’ मध्ये आणावे.
नाेकऱ्यांचे स्वरूप बदलू शकतात तज्ज्ञांच्या अनुसार राेबाेट नाेकऱ्या नष्ट करणार नाहीत, तर नाेकऱ्यांचे स्वरूप बदलतील. मानव राेबाेटची दुरुस्ती, देखभाल, टे्ननाॅलाॅजी आपरेशन यांसारखी कामे करतील. राेबाेट ऑपरेटर आणि राेबाेट मेंटेनन्स इंजिनीअर अशा नवीन नाेकऱ्या निर्माण हाेऊ शकतात.
चीनमधील 44% मनुष्यबळ तात्पुरत्या स्वरूपाच्या राेजगारात गुंतलेले आहे थिंक चायनाच्या रिपाेर्टनुसार चीनची गिग इकाॅनाॅमी जगात सर्वांत माेठी आहे.
डिलिव्हरी आणि राइड हेलिंगसारख्या प्लॅटफाॅर्मवर 8.4 काेटी लाेक काम करतात. तर तात्पुरत्या राेजगारावर अवलंबून असलेली लाेकसंख्या 32 काेटी (सुमारे 44%) पर्यंत पाेहाेचली आहे.
भारतात काय स्थिती? भारतात अजून अंतिम टप्प्यातील वितरण माेठ्या प्रमाणात मानवी कामगारांवर अवलंबून आहे. तथापि माेठे वेअरहाऊस, ई-काॅमर्स लाॅजिस्ट्निस, मॅन्यूफॅ्नचरिंग आणि ग्राहक सेवा क्षेत्रांमध्ये एआय आणि ऑटाेमेशनचा उपयाेग वेगाने वाढत आहे