मुंबई, 26 जुलै (आ.प्र.) : देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी 8.61 ट्नके विद्यार्थी एकट्या महाराष्ट्रात शिक्षण घेत असताना केंद्राच्या समग्र शिक्षा अर्थसंकल्पात राज्याच्या वाट्याला अवघा 3.06 ट्नके निधी येताे, याकडे लक्ष वेधत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्रासाठी भरीव निधीची मागणी केली.
केंद्रपुरस्कृत याेजनांच्या आढाव्यासाठी आयाेजित राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षण मंत्र्यांच्या परिषदेत भुसे बाेलत हाेते. 2025-26 मध्ये देशाचा एकूण समग्र शिक्षा अर्थसंकल्प 87,367 काेटी रुपये हाेता. त्यापैकी महाराष्ट्राच्या वाट्याला 2673 काेटी रुपये आले. राज्यातील एकूण शाळांपैकी अनुदानित शाळांचे प्रमाण केवळ 25 ट्नके असले तरी राज्यातील 50 ट्नके विद्यार्थी याच शाळांमध्ये शिकत आहेत. या शाळांना राज्य शासन स्वतःच्या अर्थसंकल्पातून 100 ट्नके वेतन व निवृत्तीवेतन अनुदान देते. तथापि, केंद्राकडून त्यांना पाठ्यपुस्तकांसारखी किमान मदतच मिळते. वर्गखाेल्या, प्रयाेगशाळा आणि इमारतींसाठीचे पायाभूत सुविधा अनुदान केवळ शासकीय शाळांपुरते मर्यादित आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी समग्र शिक्षा याेजनेची पुनर्रचना करताना अनुदानित शाळांचाही पायाभूत सुविधा निधीत समावेश करावा, अशी आग्रही विनंती भुसे यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा गाैरवशाली इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याच्या केंद्र व एनसीईआरटीच्या निर्णयाबद्दल भुसे यांनी केंद्राचे आभार मानले.