नवी दिल्ली, 26 जुलै (वि.प्र.) : रेडसीर स्ट्रॅटेजी कन्सल्टंट्सच्या अहवालानुसार, 2030 पर्यंत भारतातील गिग इंटरनेट प्लॅटफाॅर्म्स देशाच्या वार्षिक 80 लाख बिगरशेती राेजगारांच्या गरजेपैकी जवळपास 70% गरज पूर्ण करू शकतात. सल्लागार संस्थेचा अंदाज आहे की, मासिक सक्रिय गिग इंटरनेट कर्मचारी संख्या सध्याच्या 60 लाखांवरून या दशकाच्या अखेरीस 2.10 काेटीपर्यंत पाेहाेचेल.
म्हणजेच जवळपास तिप्पट हाेईल. या वाढीमध्ये महिला आणि प्रथमच काम करणारे कर्मचारी प्रमुख याेगदान देतील, अशी अपेक्षा आहे. अहवालानुसार, गिग इंटरनेट कामाची व्याख्या डिलिव्हरी, राइड हेलिंग आणि घरगुती सेवांमधील प्लॅटफाॅर्म- आधारित राेजगार अशी केली आहे.
यात नमूद करण्यात आले आहे की, एकूण गिग इंटरनेट मनुष्यबळामध्ये महिलांचे प्रतिनिधित्व अजूनही कमी असून, त्या एकूण कामगारांपैकी केवळ 1% इतक्याच आहेत. तथापि घरगुती सेवांमधील त्यांचा सहभाग आधीच 35-45% पर्यंत पाेहाेचला आहे.
ताे कामाच्या लवचिक व्यवस्था आणि स्थानिक नाेकऱ्यांद्वारे संधी वाढवल्यास विस्तारासाठी माेठी संधी असल्याचे दर्शवताे.2030 पर्यंतच्या अंदाजित गिग वर्कफाेर्समध्ये (अस्थायी किंवा कंत्राटी स्वरूपाचे काम करणाऱ्या कामगारांच्या गटात) 30 ट्न्नयांहून अधिक कामगार हे श्रमबाजारात नव्याने प्रवेश करणारे असतील, अशी अपेक्षा आहे.