आराेग्याला कधीच सुटी घेता येत नाही

    27-Jul-2026
Total Views |
 
WeekendRoutine
 
काही महत्त्वाच्या गाेष्टी दुर्लक्षून सुदृढ राहण्याची सारी मेहनत या दाेन दिवसांत आपण वाया घालवताे. याचा परिणाम दिनचर्येवर तर हाेताेच साेबतच आराेग्य आणि सवयींवरही.
 
पहिली बेपर्वाई : झाेपेचे संतुलन बिघडते : दुसऱ्या दिवशी सुटीच आहे असा विचार करून शुक्रवार-शनिवारी रात्री उशिरापर्यंत जागत टीव्ही पाहताे. दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा उठताे. बिछान्यातून बाहेर पडेपर्यंत नाश्त्याची वेळ टळून गेलेली असते. त्यामुळे सरळ दुपारचे जेवण केले जाते. येथे उशिरा उठलात तर उठलात पण सकाळचा नाश्ता जाे कधीही टाळू नये ताेही टळताे. सुटीच्या दिवशी उशिरा उठणे समजू शकताे. पण जर राेज सकाळी 7 वाजता उठत असाल याचा अर्थ शनिवाररविवारी 12 वाजा उठणे नव्हे.

जास्तीत जास्त 20-30 मिनिटे उशिरा उठू शकता. त्यापेक्षा जास्त उशिरा नाही. राेज ज्या वेळी झाेपता त्यापेक्षा फक्त अर्धा तास उशीरा झाेपावे. यामुळे आराेग्यावर परिणाम हाेणार नाही व सवयही बिघडणार नाही.
 
दुसरी बेपर्वाई : व्यायामाला रामराम कित्येकदा असा विचार केला जाताे की, आज रविवार आहे तर व्यायामालाही सुटी द्यावी, पण सुटी असेल त्या दिवशीही व्यायाम करावा. राेज धावत असाल, जिमला जात असाल, घरी ए्नसरसाइज वा याेग करीत असाल तर ते सुटीच्या दिवशीही करा. तशी आठवड्यातून एक दिवस व्यायामाला सुटी द्यावी पण ती आठवड्यातील मधल्या एखाद्या दिवशी द्यावी.
रविवारी नाही. कारण सुटीच्या दिवशी आपल्या शारीरिक क्रिया नगण्य असतात. विशेषकरून सुटीचा दिवस आपण घरीच घालवताे तेव्हा व्यायाम करायला हवा.
 
तिसरी बेपर्वाई : चीट मीलही करताे : सुटीच्या दिवशी आपल्याला हेही खावे तेही खावे एक दिवसाने काय माेठा फरक पडणार आहे असे वाटते. त्यामुळे आपाेआपच बर्गर, पिझ्झा वा स्ट्रीट फूडही खाल्ले जातात. आठवड्यातील पाच वा सहा दिवस आपण जाे संतुलित आहार घेत असता वा पथ्य पाळताे, ताे सुटीच्या दिवशी वाया घालवता. जर फास्टफूड खायचे नाही असे ठरवले असेल तर ते राेज अमलात आणा.

चाैथी बेपर्वाई : बाहेरचे खाण्याची लालसा : सुटीचा दिवस आहे म्हणून कुटुंब व मित्रांसाेबत बाहेर जेवायला जाण्याचे ठरवले जाते. शनिवारी रात्रीचे जेवण बाहेर केले जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारचे व रात्रीचे खाणेही जवळपास बाहेरच केले जाते. बाहेरच्या बहुतेक खाण्यात साेडा मिसळलेला असताे. त्यामुळे ते जड असते. उदा. भात, तेच डाळ आणि भाज्यांतही तिखटाचा भडीमार असताे, जाे पाेटाला जाचक असताे. या काळात भुकेपेक्षा जास्त खाल्ले जाते वा खाल्ल्यानंतर काही मिनिटांनंतर पाेट भरल्यासारखे वाटते. यामुळे आठवडाभर घरच्या जेवणातून मिळालेले पाेषण या दाेन दिवसांत वाया जाते. जर बाहेरचे काही खावयाचे असेल तर थाेडे खा.